मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

भारत- बांगलादेश Test Match मध्ये आर.अश्विनचा विश्वविक्रम

भारत- बांगलादेश Test Match मध्ये आर.अश्विनचा विश्वविक्रम

चेन्नई  - भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील चेन्नई टेस्टमध्ये आर. अश्विननं (R. Ashwin) इतिहास घडवला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी आर. अश्विननं होमग्राऊंडवर शतक झळकावलं.टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात 500 विकेट्स आणि 20 वेळा 50 रनचा टप्पा ओलांडणारा अश्विन हा एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. जगातील कोणत्याही ऑल राऊंडरला ही कामगिरी यापूर्वी करता आलेली नाही. अश्विनच्या शतकाच्या जोरावरच भारताला ३०० धावांचा पल्ला गाठता आला. अश्विनने यावेळी नाबाद १०२ धावांची खेळी साकारली, तर जडेजाने नाबाद ८६ धावा फटकावल्या. त्यामुळे भारताला पहिल्या दिवस अखेर६ बाद ३३९ अशी मजल मारता आली.

रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी दमदार खेळी करत भारताचा डाव सावरला. अश्विननं होम ग्राऊंडवर शतक झळकावलं.तर, रवींद्र जडेजानं 86 धावा केल्या. अश्विन आणि जडेजानं 195 धावांची भागिदारी केली. आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रवींद्र जडेजा पहिल्यांदा कसोटी सामन्याच्या निमित्तानं मैदानात उतरला होता. आज त्यानं 86 धावांची खेळी करत भारताला अडचणीतून बाहेर काढलं.

भारताचे दिग्गज फलंदाज आज दमदार कामगिरी करण्यात अपयशी ठरले. रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल आणि केएल राहुल मोठी धावसंख्या करु शकले नाहीत. बांगलादेशच्या हसन महमूदनं भारताला चार धक्के दिले. रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रिषभ पंतला त्यानं बाद केलं. रिषभनं चांगली सुरुवात केली होती मात्र तो 39 धावांवर बाद झाला.

भारताचा सलामीवर यशस्वी जयस्वाल ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी दमदार कामगिरी करत आहे. यशस्वी जयस्वालनं अर्धशतकी खेळी केली. त्यानं 56 धावा केल्या.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट