मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

चीन बांधतोय पृथ्वी आणि चंद्राला जोडणारा Super Highway

चीन बांधतोय पृथ्वी आणि चंद्राला जोडणारा Super Highway

देश विदेश     

बिजींग - अमेरिका, जपान आणि अन्य विकसित राष्ट्रांना आव्हान देण्यासाठी गेल्या काही दशकांपासून चीन अवकाश संशोधन क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. चीनी शास्त्रज्ञांच्या नवनवीन कल्पनांनी जगभरातील शास्रज्ञांना स्तिमित केले आहे. चीन आता पृथ्वीवरुन चंद्रावर जाण्यासाठी सुपर हायवे बांधणार आहे. सिस्लुनर स्पेस म्हणजे पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील प्रदेशात हा Space Superhighway तयार केला जाणार आहे. चिनी संशोधकांनी पृथ्वी आणि चंद्र दरम्यान नेटवर्क पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी एक रोडमॅप तयार केला आहे. या सुपर हायवे म्हणजे प्रत्यक्षात सॅटेलाईटचा मार्ग असणार आहे. जपान आणि अमेरिकेच्या स्पेस एजंसी देखील अशा प्रकारचा प्रोजेक्ट राबवणार होते. मात्र, त्याआधीच चीनने बाजी मारली आहे.

या प्रोजेक्ट अंतर्गत चंद्रावर 3 ग्राउंड स्टेशनवर 30 उपग्रहांचे संपूर्ण नेटवर्क उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या सुपर हायवेवर नेव्हिगेशन आणि रिअल-टाइम कम्युनिकेशन करता येणार आहे. चायना अकादमी ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी (CAST) आणि बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ स्पेसक्राफ्ट सिस्टम इंजिनिअरिंगच्या संशोधक या प्रोजेक्टवर काम करत आहेत.चीनच्या Chang’e-5 मोहिमेचे मुख्य डिझायनर यांग मेंगफेई यांच्या नेतृत्वाखालील टीम या प्रोजेक्टचा एक भाग आहे.

अंतराळवीरांसाठी हा स्पेस हायवे बांधला जाणार आहे. या स्पेस हायवेमुळे 20 किंवा त्याहून अधिक अंतराळवीरांना एकाच वेळी ऑडिओ तसेच व्हिडिओद्वारे पृथ्वीशी संवाद साधता येणार आहे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट