मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

राज्यात सेमी कंडक्टर प्रकल्पात ३६ हजार कोटींची गुंतवणूक

राज्यात सेमी कंडक्टर प्रकल्पात ३६ हजार कोटींची गुंतवणूक

ठाणे - विकसीत भारतामध्ये महाराष्ट्र हा देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. महाराष्ट्रात मोठ मोठे उद्योग आले आहेत. राज्य इंडस्ट्री फ्रेंडली झालं आहे. तसाच सेमी कंडक्टर हा प्रकल्प आहे. सेमी कंडक्टर प्रकल्पासाठी राज्य सरकार मदत करत आहे. सेमी कंडक्टर चीप ही माणसांच्या आयुष्यात महत्वाचं असल्याचं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी मुंबईत महापे इथं केलं.

महाराष्ट्रातल्या पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. सेमी कंडक्टर चीप हा प्रकल्प आरआरपी ग्रुप ऑफ कंपनीज यांच्यामार्फत हा उभा करण्यात येत आहे. दोन टप्यात हा प्रकल्प होणार असून इटली आणि फ्रान्स सरकारचा यामध्ये २७% वाटा आहे.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २४ हजार ५३८ कोटी एवढी गुंवतणूक करण्यात येणार आहे. दोन्ही टप्यातील घटकाची महाराष्ट्रातील एकूण गुंतवणूक ३६ हजार ५७३ कोटी एवढी असणार आहे.

राज्यात उद्योग क्षेत्राला कॅपिटल सबसिडी आहे. रेड कार्पेट सुविधा आहेत. एक खिडकी योजना असल्यामुळे उद्योग क्षेत्र विकसित होत आहे. एमएमआर क्षेत्रच नव्हे तर गडचिरोली सारख्या भागातही औद्योगिक क्षेत्र विस्तारत असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट