मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

Tupperware ने जाहीर केली दिवाळखोरी

Tupperware ने जाहीर केली दिवाळखोरी

मुंबई - प्लास्टिकचे रंगीबेरंगी डबे आणि बाटल्यांचा लोकप्रिय ब्रँड असलेल्या Tupperware ब्रँडने दिवाळखोरी जाहीर केली आहे. कंपनीची सूचीबद्ध मालमत्ता ५०० दशलक्ष ते १ अब्ज इतकी आहे. तर त्यांची देणी १ अब्ज ते १० अब्जापर्यंत वाढले आहे. जून महिन्यात कंपनीने अमेरिकेतील उत्पादन करणारा कारखाना बंद करून जवळपास १५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. कंपनीने आपली गंगाजळी कमी झाल्यामुळे भविष्यात व्यापारात टिकून राहणे अवघड असल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार Tupperware ने चॅप्टर ११ अंतर्गत दिवाळखोरी जाहीर करून संरक्षण मागितले आहे.

करोना काळानंतर कंपनीच्या नफ्यात घसरण व्हायला सुरूवात झाली. लॉकडाऊन लागले, ज्यामुळे लोक ऑफीसला जात नव्हते. अशावेळी जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या आणि इतर किचनच्या वस्तूंची विक्री खूप कमी झाली होती. करोनाची लाट ओसरल्यानंतर प्लास्टिकच्या कच्च्या मालाचे दर वाढले. तसेच कामगारांच्या वेतन आणि इतर खर्चात वाढ झाल्यामुळे तोटा वाढतच गेला.

Tupperware ची स्थापना १९४६ साली अमेरिकेत झाली होती. अर्ल टपर यांनी स्थापन केल्यामुळे त्यांच्या उत्पादनाला Tupperware हे नाव पडले. गेली ७६ लोकप्रिय असलेल्या टपरवेअरचे डबे/ बाटल्यांचे उत्पादन लवकरच कायमच्या बंद होणार आहेत. Tupperware निर्माण केलेल्या या साखळीमुळे अनेक गृहिणींना रोजगार मिळाला. Tupperware चे जाळे १०० देशात विस्तारलेले होते.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट