मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

सर्व रेल्वे सेवाची माहिती एकाच ठिकाणी देणारे सुपर App

सर्व रेल्वे सेवाची माहिती एकाच ठिकाणी देणारे सुपर App

मुंबई - रेल्वेसेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून सातत्याने प्रयत्न केले जाता. आता केंद्र सरकार नवीन रेल्वे Super App आणून रेल्वे प्रवास सुलभ करणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली की, Super ॲप सर्व रेल्वे सेवाची माहिती एकाच ठिकाणी देईल. याशिवाय रेल्वे सेवा ऑनलाईन पद्धतीने मिळवण्यासाठी याच ॲपद्वारे प्रवाशांना नोंदणी करुन सेवांचा लाभ घेता येईल .

सध्या, प्रवासी तिकीट बुकिंगसाठी IRCTC ॲप आणि वेबसाइटचा वापर करतात आणि ट्रेनची स्थिती ट्रॅक करण्यासाठी आणि PNR तपासण्यासाठी स्वतंत्र ॲप्स वापरतात. अशा किचकट परिस्थितीमुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होते, ज्यामुळे केंद्र सरकार नवीन सुपर ॲप रेल्वे प्रवाशांसाठी आणत आहे. नवीन रेल्वे सुपर ॲपबद्दल अधिक तपशील रेल्वेमंत्र्यांनी अद्याप उघड केला नाही. पण या ॲपद्वारे वापरकर्ते ऑनलाइन तिकीट बुक करू शकतील, पीएनआर स्थिती तपासू शकतील आणि ट्रेनच्या रिअल-टाइमचा स्थितीचा अंदाज घेऊ शकतील अशी माहिती मिळत आहे. सर्व रेल्वे सेवा एकाच ॲपवर उपलब्ध करून देत प्रवाशांना उत्तम सेवा देणे हेच ॲपचे उद्दिष्ट आहे.

रेल्वे मंत्री वैष्णव यांनी नमूद केले की, गेल्या दशकभरात भारतीय रेल्वेचे सोयीसुविधांसह आधुनिकीकरण आणि डिजिटल सोयीवर भर देण यावर केंद्र सरकारने जोर दिला आहे. आजकाल लांब रांगा टाळून सामान्य तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट देखील ऑनलाइन खरेदी करता येत आहे. सध्या रेल्वेच्या सर्व ऑनलाइन सेवा विखुरलेल्या पण सुपर ॲप वापरकर्त्यांसाठी अधिक सोयीस्कर बनवून या डिजीटल सेवा एकत्रित देईल.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट