मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

गणाधीश चषक कॅरम स्पर्धेत ज्युनियर ४० कॅरमपटूमध्ये चुरस

गणाधीश चषक कॅरम स्पर्धेत ज्युनियर ४० कॅरमपटूमध्ये चुरस  

  गणाधीश चषक कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी मुंबईतील शालेय-कॉलेजमधील नामवंत ज्युनियर ४० कॅरमपटूमध्ये १३ सप्टेंबर रोजी चुरस असेल.  बाळ गोपाळ-अभिलाषा गणेशोत्सव मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या सहकार्याने ही स्पर्धा काळाचौकी येथे रंगणार आहे. विजेत्या-उपविजेत्यांना एकूण ८ आकर्षक चषक व स्ट्रायकर पुरस्कार दिला जाणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिन्मय दरेकर वि. शंतनू पोटे यामधील सलामी लढतीने होणार आहे.

     मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड जिल्ह्यातील ध्रुव भालेराव, समीर खान, पृथ्वी  बांदेकर, चैतन्य दरेकर, पुष्कर गोळे, कौस्तुभ जागुष्टे, शुभम यादव, अहमद शाह, कुणाल जाधव, केविन अडसूळ, निखील कांबळे, सिद्धांत मोरे आदी ज्युनियर खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. चँम्पियन कॅरम बोर्डवर ही स्पर्धा दर्जेदार होण्यासाठी लायन्स डॉ. जगन्नाथराव हेगडे व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष लीलाधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाप्रेमी दिलीप वरेकर,  स्वप्निल शिंगे, रवींद्र गोनबरे, सिद्धेश ढोलम, शुभ्रतो वरेकर, ऋषिकेश शेडगे आदी विशेष कार्यरत आहेत. प्रमुख पंचाचे कामकाज प्रणेश पवार व चंद्रकांत करंगुटकर पाहणार आहेत.  


रिपोर्टर

संबंधित पोस्ट