Breaking News
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या वाहनाचा अपघात; चालक अटकेत!
Description: भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडी गाडीने रविवारी (8 सप्टेंबर) मध्यरात्री नागपूर शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक दिली. अपघातात अनेक वाहने धडकली गेली असून, या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्त गाडीतील चालकाला अटक केली आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमधून अपघाताचे स्पष्ट दृश्य समोर आले आहे. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत असून, अपघातामागील नेमके कारण शोधण्यात येत आहे. गाडी चालवणारी व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत होती का याचाही तपास केला जात आहे. दरम्यान, हा अपघात चर्चेचा विषय बनला आहे आणि अनेकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade