Breaking News
दीड दिवसांच्या गणपतीचे भक्तिभावाने विसर्जन
मुंबई -:मोठ्या भक्ती भावाने काल आगमन झालेल्या गणरायाचे आज दीड दिवसानंतर विसर्जन करण्यात आले. काल अतिशय आनंदाने तसेच भक्तीभावाने घरोघरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे आज राज्यभरात वाजतगाजत मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले.
राज्यभरातील नदी , तलाव , पाणवठे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी बांधलेल्या कृत्रिम हौदामध्ये नागरिकांनी विसर्जन केले. पुण्यात नदीपात्रामध्ये विसर्जन न करता पुणे महानगर
पालिकेतर्फे विविध ठिकाणी पाण्याचे कृत्रिम विसर्जन हौद बांधण्यात आले आहेत.या विसर्जन हौदात मनोभावे नागरिकांनी बाप्पाचे विसर्जन केले , राज्यातही अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर