मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मुंबईच्या एसी लोकलमध्ये दंड मागितल्याने टीसीला मारहाण; शर्ट फाडला, बुक्के मारले आणि.., विरार एसी लोकलमधला व्हिडीओ व्हायरल

दंड मागितल्याने टीसीला मारहाण; शर्ट फाडला, बुक्के मारले आणि.., विरार एसी लोकलमधला व्हिडीओ व्हायरल

मुंबई: मुंबईतील चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या जलद वातानुकूलित (एसी) लोकल ट्रेनमधील एका प्रवाशाने तिकीट तपासणीदरम्यान रेल्वे तिकिट तपासणीस (टीसी) ला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. बोरिवली स्थानकादरम्यान हा सर्व प्रकार घडला होता. 

मुख्य तिकीट निरीक्षक जसबीर सिंग हे तिकीट तपासत असताना त्यांना एसी लोकल ट्रेनमध्ये तीन प्रवासी प्रथम श्रेणीचे तिकीट घेऊन प्रवास करत असल्याचे आढळून आले. जसबीर सिंग यांनी प्रवाशांना रेल्वेच्या नियमानुसार दंड भरण्यास सांगितले. त्यानंतर दुसरा प्रवासी अनिकेत भोसले याने जसबीर सिंग यांच्याशी वाद घातला कालांतराने वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. ज्यावेळी लोकल बोरिवली स्थानकावर पोहोचली तेव्हा सिंग यांनी भोसले यांना लोकलमधून उतरण्यास सांगितले पण भोसले यांनी नकार दिला.जसबीर सिंग यांना झालेल्या मारहाणीत ते जखमी झाले असून प्रवाशाने त्यांचा शर्ट फाडल्याचेही व्हिडीओमधून समोर आले होते. 

पुढे काय झालं?

सदर हाणामारीत जसबीर सिंग यांनी इतर प्रवाशांकडून दंडात्मक स्वरुपात जमा केलेली रक्कम 1500 रुपयेही गहाळ झाल्याचे समोर आले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ एसी लोकलमध्ये असलेल्या एका प्रवाशाने बनवला. जसबीर सिंग आणि 3 विनातिकीट प्रवाशांची हाणामारी सुरु होती. यानंतर आरपीएफचे काही अधिकारी लोकमध्ये दाखल झाले आणि प्रवासी अनिकेत भोसले याला नालासोपारा येथे लोकलमधून उतरवण्यात आले. या घटनेनंतर आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर 3 तरुण वटणीवर आले आणि त्यांनी आपली चूक मान्य केली. या घटनेत दसबीर सिंग यांचे गहाळ झालेले 1500 रुपये देखील जसबीर सिंग यांना परत केले आणि लेखी माफीनामा सादर केला. एफआयआर नोंदवला गेला तर त्याच्या नोकरीवर परिणाम होईल या हेतून जसबीर सिंग यांनीच मोठं मन दाखवत प्रवाशांवर गुन्हा न दाखल करत सक्त तकीद देऊन सोडले.

नेमकी घटना काय?

चर्चगेट-विरार जलद एसी लोकल ट्रेनमध्ये गुरुवारी एका प्रवाशाच्या बेशिस्त वर्तनामुळे गोंधळ उडाला होता. या वादाचे रूपांतर रेल्वे टीटीसोबत हाणामारीत झाले. चर्चगेट ते विरार एसी लोकल ट्रेनमध्ये फर्स्ट क्लासचे तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढलेल्या तीन प्रवाशांनी मुख्य तिकीट निरीक्षकाला मारहाण केली. या घटनेदरम्यान, जसबीर सिंग हे किरकोळ जखमी झाले. या घटनेचा व्हिडीओ डब्यातील तीन प्रवाशांनी रेकॉर्ड केला होता. जसबीर सिंग यांनी या प्रवाशांना त्यांची तिकिटे दाखवण्यास सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिकीट चुकीचे असल्याचे समजल्यानंतर टीसीने त्यांना रेल्वेच्या नियमानुसार दंड भरण्यास सांगितले. त्यानंतर अनिकेत भोसले नावाच्या प्रवाशाने सिंग यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर अधिकाऱ्याने त्यांना पुढील बोरिवली स्थानकावर ट्रेनमधून उतरण्यास सांगितले. मात्र भोसले यांनी नकार दिला वाद घातला आणि या वादाने रुपांतर हाणामारीत झाले.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट