Breaking News
अटल सेतूमुळे मासेमारीत ६०% घट, मच्छिमार संस्थेकडून याचिका दाखल
मुंबई - मुंबई आणि नवी मुंबई यांतील अंतर कमी करणाऱ्या भर समुद्रात उभारलेल्या अटल सेतूमुळे खाडीतील 60 टक्के मासे कमी झाले आहेत. यामुळे मासेमारीवर मोठा परिणाम होत असून आमच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे येथील मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी मरी आई मच्छिमार सहकारी संस्थेने केली आहे. मरी आई मच्छिमार सहकारी संस्थेने याबद्दल मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखले केली. यावर याचिकेवर 28 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
मासेमारी हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही खाडीत मासेमारी करतो. मासेमारी हेच आमच्या उत्पन्नाचे स्रोत आहे. मुंबईला नवी मुंबईशी जोडणाऱ्या 21.8 किमी असलेल्या अटल सेतूचे बांधकाम 2018 पासून सुरु झाले. यानंतर हळूहळू खाडीतील मासे कमी होत गेले. अटल सेतूमुळे आमच्या उपजीविकेवर परिणाम झाला, असा दावा या याचिकेतून करण्यात आला.
अटल सेतूमुळे वाशीगाव, जुहूगाव, कोपरखैराणे, घणसोली, गोठीवली, दिवा आणि बेलापूर येथील कोळीवाड्यातील मच्छिमारांचे उत्पन्न घटले आहे. यामुळे या मच्छिमारांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. अटल सेतूमुळे मच्छिमारांच्या उपजिवेकेवर थेट फटका बसला आहे. पण अटल सेतूच्या जवळ असलेल्या कोळीवाड्यांनाच नुकसान भरपाई देण्यात आली. आम्हालाही नुकसानभरपाईच्या धोरणानुसार ती मिळायलाच हवी, अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे