Breaking News
मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे 90 टक्के भरली
महानगर
मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा 90 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा 13,15,165 दशलक्ष लिटर इतका झाला आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा 90.87 टक्क्यांवर पोहचला आहे. धरणक्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिला तर येत्या काही दिवसांत जलाशयांमधील पाणीसाठ्यात वाढ होऊन 100 टक्क्यांवर पोहचेल. मध्य वैतरणा धरण 4 जुलै रोजी ओव्हर फ्लो झाले. 7 जलाशयांपैकी 5 जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. या धरणांमध्ये आजच्या तारखेपर्यंत किती पाणीसाठा जमा झाला हे आपण जाणून घेणार आहोत.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा 90 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा 13,15,165 दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण 90.87 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. 81.72 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागच्यावर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी सातही धरणातील पाणीसाठा 9 टक्क्यांनी वाढला आहे.
मुंबई शहर आणि उपनगराला ७ जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या 7 जलाशयांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये 5 धरण आणि 2 तलाव आहेत. सध्या मुंबईला पाणीपुरवठ्या करणाऱ्या धरणार मुबलक पाणीसाठा निर्माण झाल्यामुळे मुंबईत लागू केलेली 10 टक्के पाणी कपात रद्द होण्याची शक्यता आहे. जून महिन्यात कमी पाऊस आणि पाण्याच्या कमतरतेमुळे पाणी कपात ही लागू करण्यात आली होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे