मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मफतलाल गिरणी कामगारांना न्याय मिळाला

मफतलाल गिरणी कामगारांना न्याय मिळाला

भायखळा भागातील सुप्रसिध्द मफतलाल मिल जून 2000 साली व्यवस्थापनाने अचानक बंद केली. कामगारांचा रोजगार गेल्यामुळे सारेच चिंताग्रस्त झाले होते. त्यानंतर त्यांनी सातत्याने आपली देणी मिळणेबाबत संघर्ष केला. मॉनिटरिंग मीटिंग मध्ये माजी न्यायमूर्ती कडे अनेकदा चर्चा घडवून आणल्यामुळे कामगारांची देणी टप्प्याटप्प्याने मिळत गेली. उशीर झाला परंतु आपल्या मागण्या लावून धरण्यात कामगार समितीने कोठेही हयगय केली नाही. उर्वरित देणी व्यवस्थापन देणेविषयी टाळाटाळ करीत होते. तेव्हा कामगार न्यायालयात जाऊन दाद मागितली आणि कामगार बंधूंचे 19 कोटी रुपये मिळविण्यात यशस्वी झालो. मुंबईतील बंद गिरणी कामगारांना शासनाच्या वतीने घरे मिळत असताना मफतलाल गिरणी कामगारांना सदर योजनेत समाविष्ट केले नव्हते. तेव्हा कामगारानी शासकीय दरबारी सतत आग्रह धरल्यामुळे मफतलाल कामगारांना त्या यादीत समाविष्ट करून घेतले. त्यामुळे काही कामगारांना घरे देखील मिळाली. 

जेव्हा मफतलाल गिरणी बंद झाली त्यानंतर 2004 मध्ये मान्यताप्राप्त युनियन राष्ट्रीय मिल मजदूर संघासोबत व्यवस्थापनाने एक करार केला होता. मिलच्या जागेत 1000 स्के. मीटर जागेत 10 हजार स्पिंडल चालविणेबाबत करार झाला होता. परंतु मफतलाल व्यवस्थापन दुर्लक्ष करीत होते. मॉनिटरिंग मिटींग मध्ये सातत्याने चर्चा घडून येत होत्या.दिलेल्या शब्दाला न जागणारे व्यवस्थापन काही केल्या दाद लागू देत नव्हते. काही निष्पन्न होत नाही मफतलाल गिरणी कामगारांच्या सर्व श्रमिक संघटनेचे कॉ. अँड श्री विजय कुलकर्णीसाहेब, कॉ. श्री बी  के आंब्रे साहेब, कॉ. श्री उदय भट साहेब, कॉ. श्री कल्पेश नाडकर्णी सर यांच्या  सल्ल्याने मुंबई हायकोर्टात सर्वश्री अँड श्रीमती जेन कोक्स, श्री अमिय शूक्ला, श्रीमती रोहिणी थ्यागराजन, श्री  शक्ति वर्धन या बड्या वकिलांचा आधार घेऊन केस केली. याचिका नंबर 429/2024/1029/2024 मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट याचिका नंबर 8859/9860/2024 असा आहे. त्याचा निकाल दिनांक 12.07.2024 रोजी निकाल कामगरांच्या बाजूने लागला आणि कामगार जिंकले. जेव्हा सदर याचिका हायकोर्टात आपल्या बाजूने निर्णय दिला तेव्हा प्रतिवादी मिल व्यवस्थापन आणि इतर यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले. श्री कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी सारखे बलाढ्य त्यांचे वकील असताना कामगार चिंताग्रस्त झालो होतो. हातातोंडाशी आलेला घास हिसकवून घेतात की काय, असा प्रश्न मनात थैमान घालत होता. सुदैवाने सुप्रीम कोर्टात देखील कामगारानी बाजी मारली. आणि कामगारांना अखेर न्याय मिळाला. 

मफतलाल मिल बंद झाल्यापासून अनेकांनी कामगारांना दिलासा दिला त्यापैकि सर्व श्रमिक संघटना पदाधिकारीयांचे पाठबळ मिळाल्याने मफतलाल मिलच्या जागेत 1000 स्क्वे. मीटर जागेत 10 हजार स्पिंडल पुन्हा सुरू होणार आहेत. विशेष महणजे कामगारांच्या वतीने या सर्व कामाची जबाबदारी निस्वार्थपणे सांभाळणारे श्री भास्कर भगत, तुकाराम मारणे श्री लक्ष्मण पाटकर श्री मोहन पाटील नंदेश नाईक, मॅक्सी फर्नांडिस,भगवान गावकर यांचा सन्मानपूर्वक उल्लेख करावासा वाटत आहे.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट