Breaking News
मुंबईत नोकरी पण मराठी माणसाला ‘नो एन्ट्री’
मुंबई - देशभरातील लाखो स्थलांतरीतांना रोजगार देणाऱ्या महानगरी मुंबईमध्ये खासगी आस्थापनांमध्ये मराठी व्यक्तींना रोजगाराच्या संधी नाकारल्या जात असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून उघडकीस येत आहेत. आज यामध्ये अजून एका घटनेची भर पडली आहे. अंधेरीतील मरोळ येथील आर्या गोल्ड नावाची ही कंपनी आहे. डायमंड फॅक्टरीत प्रोडक्शन मॅनेजर पदासाठी जागा रिक्त आहे. या जागेसाठी Indeen Job वेबसाईटवर कंपनीने जाहिरात दिली. कंपनीकडून 25-60 हजार पगार देखील दिला जाणार आहे. मात्र अटींमध्ये नॉन महाराष्ट्रीयन असं लिहिलं होते.
मराठी माणसाने अर्ज करु नये, असे म्हटल्याने महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला आता यानंतर कंपनीला उपरती झाल्यानंतर जाहिरातीत बदल केला असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मराठी माणसाला ‘नो एन्ट्री’ असल्याची माहिती मिळताच मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे कंपनीमध्ये दाखल झाले आहेत. मराठी माणसाला ‘नो एन्ट्री’ म्हटल्यामुळे मनसे (MNS) आक्रमक झाली आहे. या जाहिरातीची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आक्रमक झाली असून मनसेचे नेते राज पार्टे कामगार नेते हे आर्या गोल्ड कंपनीच्या परिसरात दाखल झाले आहेत. शिवाय मनसे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) देखील या कंपनीमध्ये येणार आहेत. मनसे कार्यकर्ते कंपनीमध्ये दाखल होताच पोलिसांचा कंपनीमध्ये मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.
मनसे नेते आक्रमक झालेले पाहाताच आर्या गोल्ड कंपनी बाहेर शंभर ते दीडशे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ता आर्या गोल्ड कंपनीमध्ये दाखल झाले आहेत. यापूर्वी गिरगावमध्येही अशाच जाहिरातीमुळे मोठा वाद झाला होता. त्या जाहिरातीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. त्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे