Breaking News
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर आज प्रथमच मुंबई दौऱ्यावर आले होते. मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी मुंबईला जागतिक स्तरावर थिंक टँक बनवण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले. राजधानी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळा बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे हा सोहळा पार पडत असून तब्बल 30 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मोदींच्या हस्ते झालं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून सुरुवात केली. ते म्हणाले, “आज मला महाराष्ट्र आणि मुंबईसाठी तीस हजार कोटींच्या प्रकल्पासाठी भूमिपूजन आणि लोकार्पणाची संधी मिळाली. या प्रकल्पांमुळे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील कनेक्टिव्हिटी अधिक चांगली होईल. यात रोड आणि रेल्वेव्यतिरिक्त महाराष्ट्रातील नवतरुणांना कौशल विकासासाठी खूप मोठी योजनाही समाविष्ट आहे. यातून महाराष्ट्रात मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होईल.”
“महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास आहे, महाराष्ट्राकडे सशक्त वर्तमान आहे, महाराष्ट्राकडे समृद्ध भविष्याची स्वप्ने आहेत. महाराष्ट्र हे ते ज्याकडे उद्योगांची पॉवर आहे, शेतीची पॉवर आहे, फायनान्स सेक्टरची पॉवर आहे. याच पॉवरने मुंबईला देशाचं फायनान्सचं हब बनवलं आहे. महाराष्ट्राच्या याच पॉवरने महाराष्ट्राला आर्थिक पॉवर हाऊस बनवायचं. माझं लक्ष्य आहे की मुंबईला जगाचं थिंक टँक कॅपिटल बनवणार. महाराष्ट्र टुरिझममध्ये भारतातील नंबर वन राज्य बनेल”, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE