मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z

Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 

 पेट्रोल डिझेलवरील कर 24 टक्क्यांवरून 21 टक्क्यांपर्यंत घटवला.

मुंबई: विधानसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget Points) अर्थमंत्री अजित पवारांनी मांडला. त्यामध्ये शेतकरी, महिला, युवक आणि सर्व घटकांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. त्यामध्ये महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली तर शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना कायम ठेवण्यात आली आहे. तसेच प्रती दिंडी 20  ⁠हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पेट्रोल आणि डिझेलवरील मुल्यवर्धित कर  आहे, तो पेट्रोल डिझेलवरील कर 24 टक्क्यांवरून 21 टक्क्यांपर्यंत घटवला आहे.


अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा काय?

महिलांसाठी काय?

  • - मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री लाडकी बेहना या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करत आहोत. 
  • - महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी 21-60 वयोगटातील महिलांना दर महिना दीड हजार रुपये दिले जातील. जुलै 2024 पासून ही योजना सुरू करणार असून, यासाठी 46 कोटी रुपये मंजूर करण्यात येत आहेत.
  • - मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. यासाठी 8 लाख वार्षिक उत्पन्नाची मर्यादा तसंच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना पदवी शिक्षणासाठी 100 टक्के शुल्क माफ करण्यात येणार.
  • - स्वयंपाकातील इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो. गॅस सिलेंडर घराला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातील.
  • - राज्यात 10 हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येतील.
  • - ⁠बस प्रवासात सवलत.
  • - ⁠मुद्रांक शुल्कात सवलत.
  • - ⁠वर्षाला एका कुटुंबाला ३ सिलेंडर मोफत दिले जातील.
  • - ⁠बचत गटाच्या निधीत 15 हजारांहून 30 हजार निधी देण्यात येईल.
  • - ⁠यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा शासनाचा विचार आहे.
  • - आठ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना ⁠व्यावसायिक शिक्षणामध्ये शंभर टक्के सवलत दिली जाणार.

शेतकऱ्यांसाठी काय?

  • - शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना कायम करणार.
  • - कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टर पाच हजार रुपयांचं अनुदान.
  • - ⁠गाई दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर 5 रुपयाचे अनुदान 1 जुलैपासून देण्यात येणार.
  • - येत्या दोन वर्षात 163 सिंचन  प्रकल्प पूर्ण होतील
  • - ⁠सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्ड करून 15,000 कोटींचं दीर्घकालीन कर्ज मंजूर झालेला आहे
  • - ⁠3200 कोटी रुपयांचा कार्यक्रम दुष्काळी भागात पाणी पोहचवण्याचा राबविण्यात येणार आहे
  • - ⁠शेतकरी यांना दिवसा विज पुरवठा करण्यासाठी 15,000 कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात येत आहे 
  • - ⁠मागेल त्याला सौरपंप दिला जाणार आहे.
  • - अभ्यासक्रम पुर्ण करणारे तरुण जास्त आहे.
  • - ⁠10 हजार रुपये विद्यावेतन दिल जाईल.
  • -- संजय गांधी निराधार योजनेला 1 हजारावरुन दीड हजार रुपयांच अनुदान मिळालं.
  • - ⁠शेती कृषी पंपाचे सर्व थकित बील माफ करण्यात आलंय.
  • - ⁠नवीन रुग्न वाहिका खरेदी केल्या जातील.
  • - ⁠मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना राबवली जाईल.
  • - मुंबई किनारी मार्गाच काम जवळपास पूर्ण झालेलं आहे.,⁠दोन ही मार्गीका खुल्या केलेल्या आहेत.
  • - ⁠रायगड किल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा केला जाईल त्याचा खर्च राज्य सरकार करणार आहे .
  • - ⁠माळशेज घाटात व्हयुविंग गॅलेरी उभारण्यात येणार.


वारकऱ्यांसाठी काय?  

  • - तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज प्रस्थान होत आहे. ⁠लाखो वारकरी आहेत प्रत्येकी वारीला 20  ⁠हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. 
  • - ⁠सर्व वारकरी यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
  • - ⁠मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • - पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री व्यवस्थापन, निर्मल वारीसाठी 36 कोटी रुपये वितरित.
  • - प्रति दिंडी 20 हजार रुपये दिले जाणार, मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन केले जाणार.


महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा अजून वाढणार

  • २०२३-२४ मध्ये कर्जाचा डोंगर ७,११,२७८ लाख कोटींवर.
  • सरकार वर्षाला देत आहे कर्जावर ४८,५७८ कोटींचे व्याज.
  • २०२३-२४ साठी अपेक्षित खर्च २,३१,६५१ लाख कोटी.
  • जिल्हा वार्षिक योजनांवरचा खर्च २९ हजार १८८ कोटी.
  • २०२३-२४ मध्ये १ लाख ११२ कोटींची परकीय गुंतवणूक शक्य.
  • २०२३-२४ मध्ये औद्योगिक विकास ७.६ टक्क्याने अपेक्षित.
  • बांधकाम क्षेत्राचा विकासदर १४.५% वरुन ६.२%पर्यंत घसरणार.
  • शहरी भागात गृहनिर्माण ३०% घटले,१९.४लाख घरांचे होते उद्दिष्ट.
  • मुंबईत वर्षभरात २.६ लाख नव्या गाड्या रस्त्यावर.
  • मुंबईतल्या गाड्यांची संख्या ४७ लाखांवर .
  • अवकाळी,अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना ६,४२० कोटींची मदत केली.


रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट