Breaking News
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आरएमएमएसतर्फे मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना मान्यतेने झालेल्या अमृत महोत्सवी क्रीडा संघटक गोविंदराव मोहिते चषक ७/९/११/१३ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेत अधवान ओसवाल, यश चुरी, कृष्णव दर्यानानी, व्ही. प्रीजेश यांनी गटविजेतेपद पटकाविले. ७ वर्षाखालील गटामध्ये निर्णायक पाचव्या फेरीत अधवान ओसवालने वजीर व हत्तीच्या सहाय्याने ईशान शाहच्या राजाला २६व्या चालीला शह दिला आणि सलग पाचवा गुण वसूल करीत प्रथम क्रमांकावर झेप घेतली. आरएमएमएसचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते व अन्य पदाधिकारी निवृत्ती देसाई, अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, शिवाजी काळे, बुध्दिबळ प्रशिक्षक राजाबाबू गजेंगी, संयोजक लीलाधर चव्हाण आदींच्या उपस्थितीत विजेते-उपविजेत्यांना गौरविण्यात आले. स्पर्धेला आमदार सचिनभाऊ अहिर यांचे मार्गदर्शन लाभले होते.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्तच्या बुध्दिबळ स्पर्धेमधील ७ वर्षाखालील गटात अधवान ओसवालने (५ गुण) प्रथम, निर्वाण दर्यानानीने (४ गुण) द्वितीय, क्षितीज सुंदरमने (४ गुण) तृतीय, अबीर अगरवालने (३.५ गुण) चौथा, शनय शाहने (३ गुण) पाचवा, ईशान शाहने (३ गुण) सहावा; ९ वर्षाखालील गटात यश चुरीने (४ गुण) प्रथम, विस्मित सावंतने (४ गुण) द्वितीय, आधीलने (३ गुण) तृतीय, रियान बम्बोटीयाने (३ गुण) चौथा, विवान रंजनने (३ गुण) पाचवा, रीव्वान राठोडने (३ गुण) सहावा; ११ वर्षाखालील गटात कृष्णव दर्यानानीने (४ गुण) प्रथम, समक्ष कर्नावटने (४ गुण) द्वितीय, आराध्य पुरोने (४ गुण) तृतीय, नील भटने (४ गुण) चौथा, जश पारिकने (३ गुण) पाचवा, दिक्षण प्रभूखोतने (३ गुण) सहावा तर १३ वर्षाखालील गटात व्ही. प्रीजेशने (४.५ गुण) प्रथम, अमोघ आंब्रेने (४.५ गुण) द्वितीय, भावा प्रनिथाने (३.५ गुण) तृतीय, शिवराज माळकरने (३ गुण) चौथा, निशांत पन्हाळकरने (३ गुण) पाचवा आणि अर्णव नवघणेने (३ गुण) सहावा पुरस्कार जिंकला.
******************************
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant