Breaking News
या प्रसिद्ध खेळाडूने जाहीर केली Test क्रिकेटमधून तात्काळ निवृत्ती
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांने आज अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहितने ही घोषणा केली, रोहित शर्माने आपल्या निवृत्तीची घोषणा करताना लिहिले आहे की, “कसोटी क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाचा मला अभिमान आहे. पण आता पुढील पिढीला संधी देण्याची वेळ आली आहे.” त्याने नमूद केले की तो वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व सुरू ठेवणार आहे.
रोहित शर्मा यांनी आपल्या कसोटी क्रिकेट कारकीर्दीत ६७ सामने खेळले, ज्यामध्ये त्यांने ४३०१ धावा केल्या. त्याच्या कारकीर्दीतील १२ शतकं आणि १८ अर्धशतकं महत्वाची ठरली आहेत. त्याची सरासरी ४०.५७ होती, जी एका सलामीवीरासाठी उल्लेखनीय मानली जाते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच नव्या कर्णधाराची घोषणा करण्याची शक्यता आहे, आगामी इंग्लंड दौऱ्यापूर्वी हा निर्णय घेतला जाणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade