Breaking News
पहलगाम हल्ल्याबाबत ट्रम्प यांचे वक्तव्य
पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ लोकांंच्या मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत व पाकिस्तान यांच्यातील तणावावर वक्तव्य केले आहे. ट्रम्प म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध नेहमीच ताणलेले असतात, पण त्यावर उभयदेश स्वतःच यावर उपाय शोधतील. काश्मीरचा संघर्ष १ हजार वर्षांपासून सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ट्रम्प यांनी असेही सांगितले की, माझे भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांशी जवळचे संबंध आहेत.. त्यांनी काश्मीरमधील संघर्षाचा उल्लेख करताना म्हटले की, हा संघर्ष हजारो वर्षांपासून चालू आहे आणि पर्यटकांवरील हल्ला खूप गंभीर होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर