Breaking News
देवरुख एस.टी. आगारातील बस टंचाईचा प्रश्न अखेर मार्गी
आगाराला मिळाल्या नवीन 10 बसेस, त्यातील 5 बसेस आगारात दाखल, नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न
आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख एस.टी. आगारातील बस टंचाईचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार शेखर निकम यांच्या अथक पाठपुराव्यामुळे आगाराला 10 नवीन बसेस मिळाल्या आहेत. त्यातील पहिल्या 5 बसेस नुकत्याच दाखल झाल्या असून, त्यांचा लोकार्पण सोहळा मोठया उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात चिपळूणच्या माजी पंचायत समिती सभापती सौ. पुजाताई निकम, युवा नेते अनिरुद्ध निकम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, प्रति…त व्यव्ती तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी, एस.टी. आगार कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी आमदार शेखर निकम अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे प्रत्यक्ष हजर राहू शकले नसले तरी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकार्पण सोहळा मोठया उत्साहात पार पडला. उपस्थित मान्यवरांनी प्रवाशांना या बसेस स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्याचे आवाहन केले.
गेल्या अनेक वर्षांपासून देवरुख एस.टी. आगारातील बससेवा अपुरी होती. बस गाडयांची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते. जुन्या बसेस सतत बिघडणे, प्रवासात अडथळे येणे आणि पावसाळ्यात बसेस गळणे यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. स्थानिक नागरिक, प्रवासी संघटना, ‘आपले देवरुख - सुंदर देवरुख' ग्रुप आणि ‘3619 देवरुखची राणी प्रेमी मित्र परिवार' यांनी हा मुद्दा वारंवार उपस्थित केला आणि आमदार शेखर निकम यांच्याकडे निवेदन दिले.
सदर प्रश्नाची गंभीर दखल घेत आमदार शेखर निकम यांनी तात्काळ परिवहन मंत्र्यांना पत्र पाठवून नवीन बसेस मिळवण्यासाठी आग्रह धरला. महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनातही त्यांनी हा प्रश्न प्रभावीपणे मांडला. पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत यांची विशेष मदत लाभल्याने महायुती सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यात मोठे यश मिळाले.
या नव्या बसेस मिळाल्याने सांगमेश्वर तालुक्यातील प्रवाशांनी समाधान व्यव्त केले असून, आमदार शेखर निकम यांच्या विकासाभिमुख भूमिकेचे कौतुक केले आहे. ‘आमदार साहेबांचा हा लढा नसता तर आजही आम्हाला जुन्या बसमध्ये हाल सोसावे लागले असते,' अशी भावना अनेकांनी व्यव्त केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar