Breaking News
मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताच एडव्होकेट गुणरत्न सदावर्ते पुन्हा मैदानात आले आहेत. त्यांनी थेट मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. जरांग्यांनी मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोपही सदावर्ते यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनीच पुन्हा मुख्यमंत्री व्हावं असं थेट म्हणतानाच, फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना फडणवीस हे बाजीगर ठरल्याचं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. सदावर्ते यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आणि त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची शुभेच्छा दिली.
बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है यावर मतदारांचा विश्वास आहे. देशात संविधान सर्वोच्च असून एकाच जातीच्या आधारावर निवडणूक होत नाही असंही सदावर्तेंनी म्हटलं. मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका करताना जरांगेंनी मराठ्यांची दिशाभूल केल्याचा आरोपही सदावर्ते यांनी केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर