Breaking News
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जिजामाता नगर महाराजाचे विश्वासू सेवक संतोष कदम यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी महाराजांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली आणि त्यांच्या सेवेची दखल घेण्यात आली. संतोष कदम हे जिजामाता नगर महाराजाचे विश्वासू सेवक आहेत आणि त्यांनी महाराजांच्या सेवेत अनेक वर्षे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची प्रशंसा सर्वदूर करण्यात येते.
संतोष कदम यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त आदर्श स्वराज्य वृत्तपत्राचे संपादक तसेच युवा उद्योजक उदय अशोक पवार, नित्यानंद हॉटेलचे मालक राघू शेट्टी, शंकर शेट्टी यांच्यासह संजय पालव, रवींद्र बडवे, हरीचंद्र घाडीगावकर, निलेश परब, निलेश नरवडे, अनिल जाधव, राजेश सावंत, समीर मानकर, आणि अरविंद पाचपुते यांनी उपस्थित राहून त्यांना प्रदीर्घ उत्तम आरोग्यदायी आनंदी सुखमय आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर