मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

संजय नाना आंबोले यांच्यामुळे शिवडीत तिरंगी लढत


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय नाना आंबोले यांनी २०१७ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पूर्वी भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये प्रवेश केला. लालबाग-परळचे दोनदा कार्यसम्राट नगरसेवक राहिलेल्या आंबोले यांनी शिवसेना सोडण्याचे एक कारण म्हणून घराणेशाही हे सांगितले. आंबोले यांनी आरोप केला की, स्थानिक शिवसेना आमदाराने आपली राजकीय कारकीर्द संपवण्याची धमकी दिली आणि पक्ष बदलण्यास प्रवृत्त केले. भारतीय राजकारणाच्या संदर्भात, घराणेशाही आणि पक्षपाताचे आरोप असामान्य नाहीत. आंबोले यांनी तेव्हा केलेला पक्षबदल आणि आता २०२४ च्या शिवडी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून घेतलेली भूमिका गतिशीलतेतील गुंतागुंत आणि स्थानिक पातळीवर राजकारण्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकते.


नाना आंबोले यांनी भारतीय राजकारणात घराणेशाही या मुद्द्यावर गांधी परिवाराला दोषी धरणार्‍यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की घराणेशाहीच्या आरोपातून स्वतःला दूर ठेवणारे राजकारणी आता स्वतःच घराणेशाहीचे समर्थन करत आहेत.


या विषयावर नाना आंबोले यांनी त्यांचे मत नोंदवले आहे, ज्यात त्यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून गांधी परिवारावर टीका करणार्‍यांची दुहेरी भूमिका प्रकट केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की ही दुहेरी भूमिका राजकीय धोरणातून दिसून येते, ज्यामध्ये एकीकडे घराणेशाहीचा विरोध केला जातो, तर दुसरीकडे स्वतःच्या कुटुंबाच्या राजकीय हितासाठी घराणेशाहीचे समर्थन केले जाते.


नाना आंबोले यांच्या मते घराणेशाहीच्या मुद्द्यावरून गांधी परिवाराला दोषी धरणारे राजकारणी स्वतःच्या कुटुंबाच्या राजकीय हितासाठी घराणेशाहीचे समर्थन करत आहेत, ही दुहेरी भूमिका राजकीय धोरणातून दिसून येते. त्यांनी राजकीय सत्तेसाठी घराणेशाहीचा वापर करण्यांवर सडकून टीका केली आहे. 


संजय नाना आंबोले यांच्या मनात समाजसेवेचा ध्यास तरुणपणीच रुजला, नागरिकांची साथ आणि विश्वास याच्या जोरावर समाजसेवा करण्यास स्फुरण मिळाले. त्यातूनच आजचा हा नाना आंबोले यांची राजकीय कारकिर्द तुमच्या समोर अाहे.


राजकारणातले बरेच डाव प्रतिडाव यांवर निकराने मात करत त्यांच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या असंख्य मित्र, सहकारी, माता-भगिनी यांनी केलेल्या तिसऱ्या पर्यायाच्ता विनंतीचा मान राखत यावेळी विधानसभेच्या निवडणूकीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी नाना आंबोले निवडणूक लढवत आहेत. कोणाच्याही कोणत्याही कामाला धावणाऱ्या नाना ह्यांनी सुज्ञांच्या विनंतीचा मान ठेवून शिवडी विधानसभेतून अपक्ष उमेदवार म्हणून आपली उमेदवारी दाखल केली आहे.


समाजातील तळागाळातील सर्व घटकांच्या समस्यांची जाण व त्या सोडविण्यासाठी आजवर केलेले प्रामाणिक प्रयत्न हीच त्यांची निवडणूकीला सामोरे जाण्यासाठीची पुंजी आहे. त्यांच्यावर झालेले आई-वडील, गुरुवर्य यांचे संस्कार, चांगल्या सहकाऱ्यांच्या, तरूणांच्या तसेच नागरिकांच्या लाभलेल्या साथीमुळे झालेला हा आजपर्यंतचा सामाजिक तसेच राजकीय प्रवास सुरू आहे.


छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नितिमूल्यांवर चालून परळ-लालबाग-शिवडीच्या विकासात मोलाची भूमिका त्यांना निभावायची अाहे. आणि हे सर्व केवळ आणि केवळ नागरिकांच्या आशिर्वादाने, विश्वासाने आणि साथीने साध्य होईल याचा त्यांना विश्वास आहे.


नाना आंबोले यांनी स्वप्नातील शिवडी विधानसभा साकारण्यासाठीचं प्रतिज्ञापत्र मतदारांसमोर मांडलं आहे. त्तात एकता पुनर्विकास योजना उपकरप्राप्त इमारती, जुन्याचाळी, म्हाडा वसाहती यांच्यासाठी शिवडी स्वयं-पुनर्विकास योजना राबविणार असल्याचंचते सांगतात. स्वयं-पुनर्विकास योजनेमधुन जी जागा उपलब्ध होईल त्यातुन मतदार संघातील युवक-युवती व बाल मित्रांसाठी अत्याधुनिक अॅड. नागेश पवार स्पोर्टस् कॉम्प्लेक्स बांधणार असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले आहे.


लोकसंख्येच्या मानाने मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्याची होत असलेली हेळसांड पाहता सहकारी तत्त्वावर अत्याधुनिक डॉ. अरूणा शानबाग आरोग्य सेवा रूग्णालय बांधणार असल्याचं ते आवर्जून सांगतात. विधानसभा क्षेत्रातल्या नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिकेची सेवा तसेच तरुण मुलींना एचपीव्ही व्हॅक्सिन देण्यासाठी योजना त्यांनी तयार केली आहे. बारादेव पुरातन मंदिर, हेरिटेज शिवडी किल्ला, प्लेमिंगो दर्शन यांच्या अनुषंगाने शिवडी विधानसभा क्षेत्र पर्यटनाचे हेरिटेज शिवडी बँडींग करण्याच्या दृष्टीने त्यांनी नियोजन केले आहे.


प्लास्टिक मुक्त आणि कचरा मुक्त शिवडी विधानसभा क्षेत्र करण्यासाठी तातडीने "माझा विभाग स्वच्छ विभाग योजना" राबविणार असल्याचं ते नमूद करतात. विधानसभेतील निराधार ज्येष्ठ नागरीकांसाठी दोन वेळचे पौष्टिक जेवण घरपोच पोहोचविण्यासाठी "ज्येष्ठांचा श्रावणबाळ योजना" त्यांनी तयार केली आहे. तर विधानसभा क्षेत्रातल्या तरूणांना स्टार्ट अपसाठी "चंदू मास्तर स्वयंरोजगार केंद्र" सुरू करणार असल्याचं ते सांगतात. त्याचवेळी केंद्र सरकारच्या कौशल्य मंत्रालयाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी मार्गदर्शन केंद्र उभे करणार असल्याचेही ते आवर्जून सांगतात. लघु उद्योग करणाऱ्या व्यावसायिकांना कार्यालयाची गैरसोय असते अशा व्यावसायिकांसाठी वुई वर्क संकल्पनेवर आधारीत "विजय गांवकर सहकार केंद्र" उभे करणार असल्याचही ते सांगतात.


मुंबई शहरातल्या महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी २४x७ उपलब्ध असणारी "भगवा गार्ड" टीम उभी करणार असल्याचंही ते सांगतात. विधानसभा क्षेत्रातील तरुण-तरुणींना योग्य मार्गदर्शन व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देतानाच "चंद्रकांत चव्हाण गुरूजी मार्गदर्शन केंद्र" वातानुकूलित अभ्यासिका पहिल्या ६ महिन्यात उभारणार असल्याचा विश्वासवते व्यक्त करतात. तसेच आमदार म्हणून निवडून आल्यावर एका महिन्यात "आमदार एक खिडकी योजना" सुरू करणार. सर्व शासकीय योजनांचा लाभ भ्रष्टाचाराशिवाय थेट नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा दृढ निश्चय ते व्यक्त करतात.


पाण्याची समस्या, मैदानाच्या समस्या, दवाखान्याची समस्या, पर्यावरण समस्या, वाहतूक समस्या, शैक्षणिक समस्या, पायाभूत सुविधांच्या समस्या, सेवा वस्त्या पुनर्वसन समस्या, रस्त्यांची रुंदीकरण समस्या, जनतेच्या संरक्षणाची समस्या, नशामुक्ती समस्या तसेच ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी हा आपल्या घरचा माणुस अर्थात नाना आंबोले जातीने लक्ष घालणार आहेत.


शिवडी विधानसभा क्षेत्रातल्या जीवापाड प्रेम करणाऱ्या असंख्य हितचिंतक, मित्र, दगलबाज स्वार्थी राजकारण्यांकडून फक्त स्वार्थापुरता वापर झालेले सर्वपक्षिय राजकीच मित्र कार्यकर्ते यांचा आग्रह म्हणूनच शिवडी मतदारसंघाची अहोरात्र सेवा आणि सर्वांगीण विकासाची शपथ घेऊनच फक्त आणि फक्त मतदारांच्या विश्वासावर शिवडी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नाना आंबोले उतरले आहेत. नागरिकांच्या प्रेम आणि विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न त्यांच्या कुडीमध्ये प्राण असेपर्यंत करण्यासाठी नाना आंबोले वचनबध्द आहेत. वर्षाचे १२ महिने २४ तास नागरिकांच्या सेवेत कार्यरत राहण्याची हीच लेखी गॅरंटी नाना आंबोले यांनी दिली आहे.


सहउमेदवारांना शुभेच्छा देत असलेले नाना आंबोले विद्यमान आमदार आणि माजी आमदारांसाठी भलंमोठ्ठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे. शिवडी विधानसभा क्षेत्रात त्यांना गल्लीबोळातून मिळत असलेला प्रतिसाद हेच त्याच्या विजयाचे द्योतक आहे. त्यामुळे मुंबईतल्या काही मतदार संघांमध्ये चुरशीच्या लढती पाहण्यास मिळण्याची शक्यता असतानाच शिवडी मतदारसंघातून तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट