Breaking News
LAC बाबत भारत आणि चीन यांच्यात महत्त्वपूर्ण करार
नवी दिल्ली -: नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून भारतावर सातत्याने कुरघोडी करणाऱ्या चीनवर नियंत्रण ठेवण्याचा भारतीय राजनैतिक प्रयत्नांना अखेर यश आले आहे.भारत आणि चीन यांच्यात काही दिवसांपूर्वीच सीमेवर गस्त घालण्याबाबत करार झाला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) गस्तीबाबत भारत आणि चीन यांच्यात झालेल्या कराराचे श्रेय भारतीय लष्कर आणि मुत्सद्देगिरीला दिल आहे. पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचोक भागात दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये शुक्रवारी सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली, जी 29 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर 30 ते 31 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा गस्त सुरू करण्यात येणार आहे.
पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एस जयशंकर म्हणाले की, विश्वास आणि सहकार्याची पुनर्बांधणी ही दीर्घ प्रक्रिया असल्याने संबंध सामान्य होण्यासाठी वेळ लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात रशियातील कझान येथे नुकत्याच झालेल्या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार देखील भेटून भविष्यातील रणनीतीवर विचार करतील.जयशंकर म्हणाले की 2020 नंतर भारत आणि चीनमध्ये अनेक क्षेत्रांमध्ये करार झाला की सैन्य माघार घेईल, परंतु एक महत्त्वाचा मुद्दा गस्तीबाबत होता. नुकतेच 21 ऑक्टोबर रोजी डेपसांग आणि डेमचोक भागात दोन्ही बाजूंनी पूर्वीप्रमाणे गस्त सुरू करण्याचे मान्य केले होते. या करारानंतर भारत-चीन संबंध सुधारण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे, परंतु दोन्ही देशांमधील विश्वास पुन्हा जागा करणे हे अजूनही मोठे आव्हान आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar