Breaking News
रविवार दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रात्रौ 8.30 वाजता माटुंग्यातील यशवंत नाट्यगृहात स्वप्निल पंडित प्रस्तुत मेघ मल्हार व स्वरसा ईवेंटस निर्मित सुप्रसिद्ध पार्श्व गायीका उषाताई मंगेशकर ह्यांच्या सांगतीक कारकिर्दीला सत्तर वर्ष पुर्ण झाल्या बद्दल त्यांनी गाऊन अजरामर केलेल्या सुरेल गीतांचा कार्यक्रम (गप्पा आणि गाणी) "मंगेशाचे देणे "हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. ह्या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे उषाताई स्वत: गाणार आहेत.
ह्या कार्यक्रमा मध्ये आघाडीचे गायक दत्ता मदन,संतोष पाटील, अमृता दहिवेलकर आणी मोना कामत हे आपली कला सदर करणार आहेत.
ह्या कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळीत हे करणार आहेत आणि हे निवेदन हे मंदार खराडे करणार आहेत आणि ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन तबला वादक स्वप्निल पंडित यांनी केले आहे.
ह्य कार्यक्रमाच्या अधिक महिती साठी 9869014524 / 9769524288 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant