Breaking News
प्रयागराज महाकुंभ मेळ्यात तैनात होणार फक्त शाकाहारी, मद्यपान न करणारे पोलीस
लखनौ - उत्तर प्रदेशातील पवित्र तिर्थक्षेत्र प्रयागराज येथे जानेवारी २०२५ मध्ये महाकुंभमेळा भरवण्यात येत आहे. याची तयारी आता अगदी अंतिम टप्प्यात आली आहे. या निमित्ताने जमा होणाऱ्या लक्षावधी भाविकांच्या सुरक्षितचीही विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र यावेळी या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणारे पोलीस हे शाकाहारी आणि मद्यपान न करणारे असतील याची खात्री बाळगली जाणार आहे.
डीजीपी मुख्यालयातून प्रयागराजला पाठवल्या जाणाऱ्या पोलीस तुकड्यांसंदर्भात विषेश काळजी घेतली जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या महाकुंभ मेळ्यात मद्यपान आणि मांसाहार सेवन करणाऱ्या पोलिसांना तैनात केलं जाणार नाही. या व्यतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची प्रतिमा, त्यांचा स्वभाव, दैनंदिन जीवनातील वर्तणूक आणि सत्यनिष्ठा असावी अशा अटी घालण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर वयोमर्यादा आखून देण्यात आली आहे. याशिवाय शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असणाऱ्या पोलिसांनाच तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय मूळचे प्रयागराजचे असलेले पोलीस कर्मचारी हे या पोलीस बंदोबस्तामध्ये समाविष्ट नसतील, असे निर्देश देण्यात आले आहेत.
पोलीस बंदोबस्ताबरोबरच येणाऱ्या भाविकांच्या राहण्याची योग्य सोय व्हावी यासाठी देखील प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. ज्या घरांमध्ये रिकाम्या खोल्या आहेत त्या ठिकाणी भाडेतत्त्वावर भाविकांना राहण्याची सोय केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर