Breaking News
मालदीवचे पंतप्रधान भारत भेटीवर, पंतप्रधानांसोबत चर्चा
देश विदेश -
मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले होते. भारताने या आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध नोंदवला, तर इतर देशांनीही भारताला पाठिंबा दिला . लोकांनीही मालदीवचा बहिष्कार करत अनेक परदेशी टूर बुकिंग एजन्सींनीही मालदीव पॅकेज बंद करण्याची घोषणा केली होती. यादरम्यान मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांचे सोमवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आगमन झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. मालदीव आणि भारतामधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी मोहम्मद मुइज्जू हे भारत दौऱ्यावर आहेत. मोहम्मद मुइज्जू यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीसंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली आहे. मोहम्मद मुइज्जू यांनी पंतप्रधान मोदींना मालदीवला भेट देण्याचे निमंत्रण दिले. यावेळी मोहम्मद मुइज्जू म्हणाले, “आमच्या नवीन सर्वसमावेशक व्हिजन डॉक्युमेंटमध्ये विकास, सागरी सुरक्षा, व्यापार भागीदारी, ऊर्जा प्रकल्प, आरोग्य इत्यादींचा समावेश आहे. मी पंतप्रधान मोदींना मालदीव भेटीसाठी आमंत्रित करू इच्छितो. मालदीवला दिलेल्या मदतीबद्दल, विशेषत: अलीकडील अर्थसंकल्पीय मदतीबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छितो. मालदीवच्या गरजेच्या वेळी भारत त्यांच्या पाठीशी उभा राहिला”, असं मोहम्मद मुइज्जू यांनी म्हटलं.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे