Breaking News
सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आंतर शालेय १६ वर्षाखालील मुलांची विनाशुल्क कॅरम स्पर्धा ३ ते ११ ऑक्टोबर दरम्यान दैवत रंगमंच, जे.जे. हॉस्पिटल कंपाऊंड, भायखळा-पूर्व येथे आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या-उपविजेत्यांना एकूण १६ आकर्षक चषक-मेडल पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती नवरात्र महोत्सव मंडळाचे सरचिटणीस भूषण परुळेकर यांनी दिली.
शालेय मुख्य कॅरम स्पर्धे अगोदर मुंबई व इतर जिल्ह्यातील शालेय खेळाडूंना स्पर्धात्मक सराव मिळण्यासाठी यंदा देखील २४वी शालेय कॅरम स्पर्धा भरविण्यात आली आहे. सबज्युनियर कॅरमपटूना प्रोत्साहन देण्यासाठी चँम्पियन कॅरम बोर्डावर दर्जेदार स्पर्धेचे पूर्णपणे मोफत आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या शालेय खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मंडळाचे कार्यवाह चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) यांच्याकडे २९ सप्टेंबरपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष कृष्णा रेणोसे यांनी केले आहे.
*****************************
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर