Breaking News
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या वेतनात वाढ
देश विदेश
नवी दिल्ली - केंद्र सरकारने काल गुरुवारी परिवर्तनीय महागाई भत्त्यामध्ये सुधारणा करुन देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या वेतनात वाढ केली आहे.आता कामगारांच्या किमान वेतन दरात प्रतिदिन १०३५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.कामगार मंत्रालयाच्या निवेदनानुसार, यामुळे कामगारांना वाढत्या खर्चाचा सामना करण्यास मदत होईल.नवीन वेतन दर १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू होतील.
केंद्रीय क्षेत्रातील आस्थापनांतर्गत इमारत बांधकाम, लोडिंग आणि अनलोडिंग,साफसफाई, घरकाम,खाणकाम आणि कृ मीषी यासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना याचा थेट लाभ मिळणार आहे. कामगारांसाठी किमान वेतन या निर्णयानंतर भौगोलिक झोन-ए मध्ये बांधकाम, झाडूकाम,साफसफाई, लोडिंग आणि अनलोडिंगमध्ये गुंतलेल्या अकुशल कामगारांसाठी किमान वेतन दर ७८३ रुपये प्रतिदिन म्हणजे २०,३५८ प्रति महिना,अर्ध-कुशल कामगारांसाठी ८६८ रुपये प्रतिदिन म्हणजे २२,५६८ रुपये दरमहा होईल.तर, कुशल कामगारांसाठी वेतन दर ९५४ रुपये प्रतिदिन २४,८०४ प्रति महिना असेल आणि उच्च कुशल कामगारांसाठी ते १०३५ रुपये प्रतिदिन २६,९१० रुपये प्रति महिना असेल. केंद्र सरकार १ एप्रिल आणि १ ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या किरकोळ महागाईतील सहा महिन्यांच्या सरासरी वाढीच्या आधारे कामगारांसाठी वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात सुधारित करते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे