मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

एमपीएससी परीक्षेची तारीख जाहीर

तयारीला लागा! एमपीएससी परीक्षेची तारीख जाहीर; कृषि सेवेतील पदांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी मोठी संधी

राज्य लोकसेवा आयोग अर्थात  एमपीएससी परीक्षेची तारीख अखेर जाहीर झाली आहे.  विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे रद्द करण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेची नवीन तारीख घोषित करण्यात आली आहे. 1 डिसेंबर 2024 ला ही परीक्षा होणार आहे. कृषी विभागाच्या रिक्त पदांचा देखील या परीक्षेमध्ये समावेश करण्यात आला आहे.

एमपीएससी म्हणजेच राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा 25 ऑगस्ट रोजी होणार होती. मात्र, नागरी सेवा पूर्व परीक्षा आणि आयबीपीएस परीक्षेची एकच तारीख आल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांनी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यासाठी पुण्यामध्ये आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवस  आंदोलन देखील झालं होतं.  त्यानंतर 22 ऑगस्ट रोजी आयोगाची बैठक झाली आणि परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला.  असं असताना परीक्षेची नवीन तारीख मात्र जाहीर करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी हवालदिल आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आयोगाने परीक्षेची नवीन तारीख ठरवण्याबाबत हालचाल सुरू केली आणि आज त्यासंदर्भात आयोगाची मुंबईमध्ये बैठक झाली. 

या बैठकीत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली. त्याचप्रमाणे विविध घटकांसाठीच्या आरक्षणाचा विचार करून शासनाच्या विविध विभागांकडून सादर करण्यात आलेल्या पदभरती बाबतच्या मागण्यांचा समावेश करण्याबाबत निर्णय झाला. सर्व संबंधित बाबींवर सविस्तर विचार विनिमय होऊन एमपीएससी परीक्षेची नवीन तारीख घोषित करण्यात आली आहे. त्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 करीता दिनांक 29 डिसेंबर, 2023 रोजी विविध संवर्गांच्या एकूण 274 रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम, 2024, अनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षित पदसंख्या नमूद करून एकूण 524 पदांचे शुद्धिपत्रक दिनांक 8 मे, 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. या जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर शासनाच्या कृषि, पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे  दिनांक 16 ऑगस्ट, 2024 रोजीच्या पत्रासोबत महाराष्ट्र कृषी सेवा- 2024 करिता 258 पदांचे मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले. या पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 मध्ये करण्याबाबत शासनाकडून विनंती करण्यात आली होती. 


अर्ज स्वीकृती संदर्भातील शुद्धिपत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर

कृषि सेवेतील पदांचा तपशील व शैक्षणिक अर्हतेनुसार अर्ज स्वीकृती संदर्भातील शुद्धिपत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.कृषि सेवेसंदर्भात शुद्धिपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी देण्यात येईल. या अर्ज स्वीकृतीचा कालावधी, नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छपाईचा कालावधी तसेच माहे ऑक्टोबर, 2024 मध्ये आयोजित इतर संस्थेच्या भरतीप्रक्रिये संदर्भात विविध परीक्षांचे वेळापत्रक, आगामी विधानसभा निवडणुकीची आचार संहिता ,मनुष्यबळ, निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम इत्यादी बाबी विचारात घेऊन परिक्षेचे आयोजन  दिनांक 01  डिसेंबर, 2024 रोजी करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा  आयोगाने कळविले आहे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट