Breaking News
पुणे मनपा क्षेत्रातील 32 गावांनी लावले “गाव विकणे आहे”, असे बॅनर्स
पुणे - शहरांच्या महानगरपालिकांचे क्षेत्र विस्तारत असताना वेळोवेळीआसपासच्या गावांचा समावेश मनपा क्षेत्रामध्ये केला जातो. मात्र अनेकदा या गावांना शहरांप्रमाणे मूलभूत सुविधा मिळत नाहीत आणि मनपा क्षेत्रात समावेश झाल्यामुळे मोठा कर भरावा लागतो. त्यामुळे नागरिक त्रस्त होतात. असाच प्रकार पुणे मनपा क्षेत्रातील ३२ गावांच्या बाबतीत झाला असून या गावांनी “गाव विकणे आहे”, असे बोर्ड लावत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे. पुणे महापालिकेचा जुलमी कर भरू शकत नसल्याने आमचे गावच महापालिकेने विकत घ्यावे. यासाठी 32 गावांच्या माध्यमातून “गाव विकणे आहे” अशा प्रकारच्या जाहिराती गावोगावी लावण्यात येऊन पुणे महापालिकेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेने कोणत्याही सुविधा न पुरवता,टॅक्स मात्र भरमसाठ लावलेला आहे अशा पार्श्वभूमीवर “आम्ही टॅक्स भरू शकत नाही,तुम्ही आमचे गावच विकत घ्या.”अशी भूमिका ३२ गावातील ग्रामस्थांनी घेतलेली आहे. टॅक्स या विषयावर ३२ गावातील नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यासाठी पुढील मोठ्या आंदोलनाची तयारी होताना दिसत आहे. सध्या धायरी, नऱ्हे, आंबेगाव किरकटवाडी, नांदोशी,खडकवासला नांदेड, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे, कोपरे या गावात सर्वत्र बोर्ड लागल्याचे दिसत आहेत.

रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant