मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

आज होणार जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान

आज  होणार जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उद्या 18 सप्टेंबर रोजी 7 जिल्ह्यांतील 24 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. ज्यामध्ये 23.27 लाख मतदारांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील 24 जागांपैकी 8 जागा जम्मू विभागात आणि 16 जागा काश्मीर खोऱ्यात आहेत. जास्तीत जास्त 7 जागा अनंतनागमध्ये आणि किमान 2 जागा शोपियान आणि रामबन जिल्ह्यात आहेत.

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार पहिल्या टप्प्यात 219 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 9 महिला आणि 92 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. मुफ्ती कुटुंबाचा बालेकिल्ला असलेली बिजबेहारा जागाही याच टप्प्यात आहे. येथे पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांची कन्या इल्तिजा प्रथमच निवडणूक लढवत आहे. मेहबूबा आणि त्यांचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद हे मुख्यमंत्री राहिले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील 90 विधानसभा जागांवर 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. 2014 च्या निवडणुकीत पीडीपीला सर्वाधिक 28 आणि भाजपला 25 जागा मिळाल्या होत्या. दोन्ही पक्षांनी मिळून सरकार स्थापन केले होते.

5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 हटवण्यात आले. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर येथे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. 2014 मध्ये विधानसभेच्या 87 जागांसाठी शेवटची निवडणूक झाली होती, त्यापैकी 4 जागा लडाखमधील होत्या. केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर विधानसभेच्या 7 जागा वाढल्या. त्यामुळे यावेळी 19 जागांवर निवडणूक होणार आहे. विशेष राज्य असल्यामुळे कलम 370 हटवण्यापूर्वी जम्मू-काश्मीर सरकारचा कार्यकाळ 6 वर्षांचा होता, मात्र आता तो 5 वर्षांचाच असेल.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट