Breaking News
स्व. भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार सतीश आळेकर यांना …
बीड - यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा स्व. भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, पटकथा लेखक, पुणे यांना घोषित करण्यात आला आहे, समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला अशी माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली आहे.
यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने समाजकारण, साहित्य, संगीत, सांस्कृतिक, सहकार, शिक्षण, नाटक, सिनेमा आदी क्षेत्रात उतुंग कार्य केलेल्या एका मान्यवरास स्व. भगवानरावजी लोमटे यांच्या स्मृतिपित्यर्थ दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा बारावा पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त पद्मश्री सतीश आळेकर, पुणे यांना दिला जाणार आहे.
सतीश आळेकर हे गेली पन्नास वर्षापेक्षा आधिक काळ नाटककार म्हणून सर्वदूर परिचित आहेत. त्याच बरोबर सिनेमा पटकथा लेखन त्यांनी केलेलं आहे. नाटक आणि सिनेमात त्यांनी अभिनयाबरोबरच उत्तम दिग्दर्शक म्हणून त्यांचे कार्य रसिकांच्या मनामनात आहे. जीवरसायन शास्त्रात त्यांनी पदवी प्राप्त केली आणि अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावर ते नाटक लिहिणे आणि नाट्य चळवळ गतिमान करण्यात यशस्वी झाले.
त्यांची मिकी आणि मेमसहेब, महानिर्वाण, महापूर, बेगम बर्वे, शनवार रविवार, पिढीजात आदी नाटके प्रसिद्ध आणि लोकाभिमुख झाली. झुलता पूल, सामना आदी एकांकिका या सर्वोत्तम लोकप्रिय झाल्या होत्या. जैत रे जैत या मराठी सिनेमाचे पटकथा लेखन त्यांनी केले. अनेक नाटकाचे दिग्दर्शन आणि अभिनय पण त्यांनी केले आहे. यशवंतराव चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आक्रित, उंबरठा आदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर