Breaking News
तांत्रिक शिक्षण घेतलेल्या महाराष्ट्रातील 10 हजार युवकांना मिळणार जर्मनीत रोजगार
युरोपिय युनियनमधील बहुतांश देश औद्योगिकदृष्ट्या संपन्न आहेत. मात्र, काही वर्षांपासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये कुशल कामगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळाचा पुरवठा युरोपियन युनियनमधील देशांना करता यावा, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्रासोबत जर्मनीतील बाडेन-बुटेनबर्ग राज्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या अध्यक्षतेखाली कृती दलाचे गठण करण्यात आले आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जर्मनीला जाण्यापूर्वी चार महिने जर्मन भाषेचे प्रशिक्षण व संबंधित कौशल्यामध्ये वाढ होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.इच्छुक उमेदवारांनी https://script.google.com/macros/s/AKfycbyYGvDJEhhNjpNFlAaaCT8rLSar3M4pEPiHrQuV37uzJZgTEXHhhf6JVMYQcLw1OHLZ/exec या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन डायटच्या प्राचार्य आर.एस. देशमुख यांनी केले आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून ७६ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे