Breaking News
हल्ले थांबवा, कठोर कारवाई करा, बांग्लादेशात लाखो हिंदूंचे आंदोलन
ढाका - बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारताच्या आश्रयाला आल्यावर आणि काल सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांनी राजीनामा दिल्यानंतर तेथील परिस्थिती दिवसेंदिवस बिगट होत चालली आहे. आंदोलक आता देशातील अल्पसंख्यांक हिंदूंना हे त्रास देत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हिंदूमध्ये मोठ्या प्रमाणात चिंतेचे वातावरण आहे. मात्र या स्थितीतही ते संघटीत होऊन आपले संरक्षण करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. बांगलादेशची एकूण लोकसंख्या १७ कोटी असून यामध्ये हिंदू लोकसंख्या १.३५ कोटी एवढी आहे. हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 7.95% आहे. हिंदू धर्म हा बांगलादेशातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे. देशातील ६४ पैकी ६१ जिल्ह्यांमध्ये हिंदू लोक राहतात. ते शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगचे समर्थक मानले जातात. यामुळेच ते आता टार्गेट झाले आहेत. ठाकूरगाव,गोपालगंज, खुलाना आणि मौलवीबाजार या चार जिल्ह्यांमध्ये हिंदू लोकसंख्या २० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
बांगलादेश हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन ओकिया कौन्सिलनुसार, शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर देशातील 64 पैकी 52 जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याच्या 205 घटना घडल्या आहेत. अल्पसंख्याकांना सुरक्षा देण्याची मागणी परिषदेने अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्याकडे केली आहे.
शेख हसीना यांच्या अवामी लीगनेही हिंदूंना लक्ष्य केल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्याच वेळी, संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्या प्रवक्त्याच्या वतीने असेही म्हटले आहे की आम्ही वांशिक आधारावर कोणत्याही हल्ल्या किंवा हिंसाचाराच्या विरोधात आहोत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे