Breaking News
लाडका भाऊ, काय खाऊ ?
पालिकेच्या सुलतानी कारवाईमुळे ओढवणार मराठी फेरीवाल्यांवर उपासमारीचे संकट
फेरिवाल्यांच्या पाठिशी शिवसेना ठाम !
मुंबई - लालबाग येथील फेरिवाल्यांवर गेले काही दिवस सातत्याने पालिका आणि पोलीस करीत असलेल्या अन्यायकारक कारवाईमुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे.पालिका आणि पोलीस यांच्या अन्याय कारवाईचा निषेध करत फेरिवाल्यांनी लालबाग येथे जोरदार आंदोलन केले.लालबाग फेरिवाला विक्रेता संघाकडून सुरू असलेल्या या आंदोलनाला विभागीय खासदार अरविंद सावंत यांनी भेट देऊन या आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त करून शिवसेना त्यांच्या पाठिशी ठामपणे उभी असल्याचे सांगितले.सरकारवर आपला राग व्यक्त करताना खासदार सावंत यांनी "लाडका भाऊ,काय खाऊ ?" असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी केला.
लालबाग मधील या मराठी फेरिवाल्यांवर गेले काही दिवसांपासून पालिका व पोलीस सातत्याने कारवाई करीत आहेत.याचा निषेध म्हणून लालबाग फेरिवाला विक्रेता संघाने दोन दिवसाचे साखळी उपोषण आयोजित केले होते. यावेळी खासदार अरविंद सावंत म्हणाले की, मध्यंतरी महानगर पालिकेला निवडणूक होणार असा सुगावा लागताच याच फेरीवाल्यांना दहा हजार रूपया़चे कर्जरूपी अनुदान देऊन भुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.तसेच राज्य सरकारने याच फेरीवाल्यांना ३० हजार रूपये कर्जाऊ दिले.परंतु आता जर याच फेरीवाल्यांची रोजीरोटी हिरावून घेतली तर ते या कर्जाची परतफेड कशी करणार ?असा सवालही त्यांनी यावेळी केला.
फेरीवाल्यांवर आलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी फेरीवाल्यांची एकजूट महत्वाची असून शिवसेना या आंंदोलन कर्त्यांच्या पाठिशी ठामपणे उभी असल्याचे आश्वासन खासदार सावंत यांनी यावेळी दिले.तसेच क्षणिक मोहाला बळी पडून विकले जाणार नाही अशी शपथ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी विभागीय आमदार अजय चौधरी,उपविभाग प्रमुख गजानन चव्हाण,विधानसभा समन्वयक सुधीरभाऊ साळवी, माजी नगरसेवक अनिल कोकीळ,समीक्षा परळकर, शाखाप्रमुख किरण तावडे,महिला शाखा संघटक कांचन घाणेकर ,गौरी चौधरी यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant