Breaking News
बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर हल्ले; मंदिरांची जाळपोळ, दुकानांची लूट
ढाका - देशात सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी अल्पसंख्याक हिंदू समाजाला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. जमावाकडून हिंदूना लक्ष्य केले जात आहे. अनेकांनी घरे जाळण्यात आली असून दुकानांमध्ये लुटपाट केली जात आहे.बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हिंसाचार टोकाला पोहोचला आहे. पंतप्रधान शेख हसिना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडल्यानंतरही आंदोलक आक्रमक झाले आहे. आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानासह पक्षाच्या संबंधित स्थानांवर हल्ले केले. हसिना यांच्या घरातील कपड्यांसह अनेक वस्तू लांबवल्या. देशात सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनीअल्पसंख्याक हिंदू समाजाला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.जमावाकडून हिंदूना लक्ष्य केले जात आहे. अनेकांनी घरे जाळण्यात आली असून दुकानांमध्ये लुटपाट केली जात आहे. हिंदूंवर गोळ्या घालून त्यांना वेचून ठार केले जात आहे. मेहरपूर येथील इस्कॉन मंदिर तसेच काळीमाता मंदिरातही तोडफोड करून मंदिराला आग लावली आहे.
बांगलादेशात रविवारी झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये रंगपूर सिटी कॉर्पोरेशनचे हिंदू नगरसेवक हरधन रॉय हारा यांच्यासह १०० जणांचा मृत्यू झाला. इस्कॉन आणि काली मंदिरांसह हिंदूंची घरे आणि मंदिरांना लक्ष्य करण्यात आल्याने भाविकांना अन्य ठिकाणी आश्रय घ्यावा लागला.हरधन रॉय हे परशुराम ठाणे अवामी लीगचे आणि रंगपूर शहरातील प्रभाग चारचे नगरसेवक होते. दरम्यान, रविवारी झालेल्या हिंसक आंदोलनात रंगपूरच्या हिंदू नगरसेविका काजल रॉय यांचाही मृत्यू झाल्याची माहिती ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने दिली आहे.
मागच्या २४ तासांत बांगालादेशमध्ये राजकीय अस्थिरता पसरली आहे. त्यांतरकाही मंदिरांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जाते. इस्कॉनचे प्रवक्ते युधिष्ठीर गोविंद दास यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, मेहेरपूरमधील आमच्या इस्कॉन मंदिरात जाळपोळ करण्यात आली आहे. मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा देवी अशा तीन मूर्त्या जाळण्यात आल्या आहेत. या मंदिरात तीन भक्त राहत होते, ते कसेबसे मंदिरातून पळून जाण्यात यशस्वी ठरले असल्याचेही त्यांनी सांगितले.
बांगलादेशमधील प्रसिद्ध ढाकेश्वरी मंदिरावर हल्ला होण्याची शक्यता आहे. असे असले तरी रिपब्लिक वर्ल्डने दिलेल्या वृत्तानुसार या मंदिराच्या सुरक्षिततेसाठी सामान्य विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतल्याच्या बातम्या येत आहेत. पहाटे तीन वाजता ढाकेश्वरी हिंदू मंदिराचे रक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा फोटो समोर आला. इतकेच नाही तर समाज माध्यमांवर इतरही काही हिंदू मंदिरांच्या बाहेर विद्यार्थी पहारा देत असल्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant