Breaking News
एस .एस .एम .प्राथमिक शाळा काळाचौकी, येथे शिक्षण सप्ताह 2024
शिक्षण सप्ताह 22 ते 28 जुलै 2024 या उपक्रमाच्या अनुषंगाने एस .एस. एम .प्राथमिक शाळा, काळाचौकी मध्ये शिक्षण सप्ताहाचा पहिला दिवस अध्ययन अध्यापन, दुसरा मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस, तिसरा क्रीडा दिवस चौथा सांस्कृतिक दिवस, पाचवा कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, सहाव्या मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इकोक्लब उपक्रम, शालेय पोषण दिवस यामध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुखवटे बनविणे, नाट्यीकरण घेणे, वाचन कट्टा, गाणी, गणिती खेळ, मनोरंजनात्मक खेळ, खाद्यपदार्थ, वेशभूषा, गायन, निपुण प्रतिज्ञा, संख्याज्ञान, व्यायाम, वृक्षारोपण इत्यादी गोष्टीचे आयोजन केले. यातून विद्यार्थ्यांची Creativity दिसून आली व त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. यात शाळेचे संचालक अधिराज लोके गावकर, मुख्याध्यापिका. प्रिया संखे आणि सर्व प्राथमिकचे विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग घेऊन उपक्रमाचा आनंद घेतला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant