Breaking News
वायनाडमध्ये दरड कोसळली, मृतांचा आकडा 123 वर, शेकडो लोक अडकल्याची भीती
केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळ मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ४४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. तर 100 हून अधिक लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. बचाव कार्यात अग्निशमन दल, NDRF आणि स्थानिक आपत्कालीन प्रतिसाद दलाचे जवळपास 250 जवान सहभागी आहेत. एनडीआरएफची अतिरिक्त टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली आहे. मुसळधार पावसळामुळे मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास दरड कोसळली. यानंतर पहाटे 4.10 च्या सुमारास आणखी एक दरड कोसळली. सततच्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
केरळचे वनमंत्री एके ससींदरन यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं की, "दरडीखाली किती लोक अडकले आहेत, याची नेमकी आकडेवारी सांगणं फार कठीण आहे."
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी वायनाड येथील घटनेनंतर बचावकार्य वेगाने सुरू असल्याची माहिती दिली. या दुर्घटनेची माहिती मिळताच सरकारी यंत्रणेनं बचावकार्य सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर वायनाडच्या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "या घटनेबाबत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांच्याशीही चर्चा केली."
तसंच, "भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशीही चर्चा करून त्यांना बचतकार्यात मदत करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जे काही करता येईल ते करावे हे सुनिश्चित करण्यास सांगितलं," असंही मोदी म्हणाले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी या घटनेबाबत एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर पोस्ट करत, वायनाडमधील भूस्खलनातील घटनेने अत्यंत व्यथित झालो असल्याचं म्हटलं.
राहुल गांधी यांनी म्हटलं की, "या घटनेबाबत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि वायनडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून सध्याच्या परिस्थितीबाबत जाणून घेतले. त्यांनी बचावकार्य प्रगतीने सुरू असल्याबाबत माहिती दिली. मी त्यांना सर्व यंत्रणांशी समन्वय साधून एक कंट्रोल रूम तयार करत मदत कार्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारची मदत करण्यासाठी विनंती केली आहे." तसंच, "मदतकार्यासाठी आवश्यक असलेल्या मदतीची माहिती द्यावी, मी त्यांना वायनाडला शक्य ती मदत करण्याचं आश्वासन दिलयं," अशीही माहिती राहुल गांधींनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant