एम बी सी सिद्धगड प्रथम वर्धापन दिन मोठ्या दिमाखात संपन्नमुंबई -आजच्या स्पर्धेच्या युगात कोलाब्रेशन चे महत्व पटवून देत giver is achiever ह्या बीज मंत्रावर उद्योजकांना चालण्याचा सल्ला देत ४ होतकरू उद्योजकांनी  सुबोध अनंत मेस्त्री, मंगेश यादव, सुरेखा वाळके आणि दिनेश भरणे. एकत्र येत महाराष्ट्र लोकसंख्येनुसार बिझनेस क्लब ची मुहूर्तमेढ अवघ्या २४ सभासदांसोबत २०१८ साली रचली, आज बघता - बघता महाराष्ट्र बिझनेस क्लब च्या संपूर्ण मुंबई मध्ये १२ शाखा कार्यरत आहेत आणि पुण्या मध्ये सुद्धा महाराष्ट्र बिझनेस क्लब ची पाळंमूळ रुजण्यास सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील उद्योजकांना व्यवसाय करण्याच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देत उद्योजकांचा व्यावसायिक आणि बौद्धिक विकास साधत आहे, ह्याच १२ शाखांपैकी एक शाखा ती म्हणजे सिद्धगड दक्षिण मुंबई۔ ८फेब्रुवारी २०२४ रोजी सिद्धगड शाखेने मोठ्या दिमाखात वर्षपूर्ती सोहळा साजरा केला, आज अवघ्या एका वर्षात सिद्धगड शाखेत चाळीस हून अधिक सभासद असून गेल्या एका वर्षात दोन कोटीहून अधिकची उलाढाल सिद्धगड शाखेने केली आहे, पुढील वर्षात पाच कोटींच्या उलाढालीचे ध्येय त्यांनी ठेवलं आहे, गतवर्षाच्या दिमाखदार कामगिरीचे श्रेय ह्या ब्रांच च्या सर्व पदाधिकारी आणि प्रामुख्याने अध्यक्षा सौ۔ अनुजा वाव्हळ,सेक्रेटरी श्री۔अवधूत वाघ  आणि खजिनदार सौ۔ प्रीती देसाई  ह्यांना जातं۔त्यांच्या दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्वामुळे सिद्धगड शाखेचा आणि त्यातील सभासदांचा विकास झपाट्याने होणे शक्य झाले आहे۔

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट