मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

या देशात निवृत्तीचे वय होणार ७० वर्ष

या देशात निवृत्तीचे वय होणार ७० वर्ष

बिजिंग -जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश अशी ख्याती असलेल्या चीनचा जन्‍मदर घसरत चालला असून वृद्धांची संख्‍या मात्र वाढत आहे.त्‍यामुळे देशात काम करणार्‍यांची संख्‍या कमी होत आहे. ही परिस्‍थिती लक्षात घेऊन चीन सरकारने निवृत्तीचे वय १० वर्षांनी वाढवून ७० वर्ष केले जाणार आहे. चीनमध्‍ये पुरुष ६० व्‍या वर्षी आणि महिला ५५ व्‍या वर्षी निवृत्त होतात.कठोर परिश्रमात गुंतलेल्‍या महिलांना ५० वर्षांनंतरच सेवानिवृत्ती मिळते. चीनमधील सरासरी आयुर्मान (अधिक काळ जगणे) आता अमेरिकेपेक्षा अधिक आहे.जागतिक बँकेच्‍या अहवालानुसार चीनमधील सरासरी आयुर्मान ७८ वर्षांपर्यंत पोचले आहे.

अमेरिकेत सरासरी आयुर्मान ७६ वर्षे आहे.चीनमध्‍ये निवृत्तीवेतन घेणार्‍यांची संख्‍या ३० कोटींच्‍या पुढे गेली आहे. यामुळे सरकारला अधिक निवृत्तीवेतन द्यावे लागते.हा पैसा जनतेला वेतनाच्‍या स्‍वरूपात द्यावा आणि त्‍या बदल्‍यात त्‍यांच्‍याकडून काम करून घेता येईल, असा सरकारचा विचार आहे. जगभरात अनेक देशांमध्‍ये काम करणार्‍या लोकांची संख्‍या अल्‍प झाल्‍यामुळे निवृत्तीचे वय वाढवण्‍याचा विचार चालू आहे. डेन्‍मार्क, ग्रीस, इटली, आईसलँड, इस्रायल यांसारख्‍या देशांमध्‍ये कमाल ७७ वर्षे निवृत्तीची तरतूद आहे. अमेरिकेत हे वय ६६ वर्षे आहे. श्रीलंकेत निवृत्तीचे वय ५५ वर्षे होते, ते आता ६० वर्षे करण्‍यात आले आहे. फ्रान्‍समध्‍ये निवृत्तीचे वय ६२ वरून ६४ करण्‍यात आले आहे. ब्रिटनमध्‍ये निवृत्तीचे वय ६६ वर्षे आहे.

अनेक देशांमध्‍ये काम करणार्‍या लोकांची संख्‍या अल्‍प झाल्‍यामुळे निवृत्तीचे वय वाढवण्‍याचा विचार चालू आहे. डेन्‍मार्क, ग्रीस, इटली, आईसलँड, इस्रायल यांसारख्‍या देशांमध्‍ये कमाल ७७ वर्षे निवृत्तीची तरतूद आहे. अमेरिकेत हे वय ६६ वर्षे आहे. श्रीलंकेत निवृत्तीचे वय ५५ वर्षे होते, ते आता ६० वर्षे करण्‍यात आले आहे. फ्रान्‍समध्‍ये निवृत्तीचे वय ६२ वरून ६४ करण्‍यात आले आहे. ब्रिटनमध्‍ये निवृत्तीचे वय ६६ वर्षे आहे.

भारतात सेवानिवृत्तीचे वय एकसमान नाही. केंद्र सरकारी नोकर्‍यांमध्‍ये निवृत्तीचे वय ६० वर्षे आहे, तर राज्‍य सरकारांमध्‍ये ते ५८ ते ६० वर्षे आहे. अनेक राज्‍यांमध्‍ये निवृत्तीचे वय वाढवण्‍याची मागणीही सरकारकडे करण्‍यात आली आहे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट