१५ ते १८ वयोगटाच्या लसीकरणाला प्रारंभ

     आजपासून अजून एका नवीन कोरोना विरुद्ध लढाईचा प्रारंभ झाला आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीला १ जानेवारी पासून १५ ते १८ वयोगटांसाठीचे लसीकरणाच्या नोंदणीची सुरवात झाली असून आज दिनांक ३ जानेवारी पासून  मुंबईसह इतर शहरांमध्ये सुद्धा लसीकरणाला सुरवात झली आहे.  मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन ही लस वापरण्यात येणार असून, राज्यातील ६५० केंद्रांवर सुमारे साठ लाख मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

     १ तारखेपासून लसीकरणाच्या नोंदणीला सुरवात झाली असून, २००७ मध्ये किंवा त्याआधी जन्म घेतलेल्या मुलांसाठीच हे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. मुंबईमध्ये ९ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु असून ९ ते ५ वाजेपर्यंत लस उपलब्ध राहणार आहे. लहान मुलांचे लसीकरण नोंदणी करण्यासाठी  CoWIN पोर्टलवर आणखी एक स्लॉट जोडण्यात आला असून तिथून मुलांना लसीकरणासाठी स्लॉट बुक करता येणार आहे. लहान मुलांसाठी  COVID-19 वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी फारसं काही नवीन करण्याची गरज नाही. यापूर्वी लसीकरणासाठी स्लॉट बुक करण्याची जी प्रक्रिया होती तिच फॉलो करावी लागणार आहे. वॅक्सिनचा स्लॉट रजिस्टर करण्यासाठी CoWIN पोर्टल वर लॉगइन करून आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांकाचा उपयोग करुन रजिस्ट्रेशन करू शकतो त्याचसोबत, विद्यार्थी शाळेच्या आयकार्डचा वापरही करु शकतात. कोरोना विरुद्ध सुरु असलेल्या लढाईमध्ये हे सुद्धा महत्वाचे असे पाऊल आहे. आणि हा पल्ला सुद्धा अधिक जोराने पूर्ण होईल यामध्ये काही वाद नाही. 

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट