सिंधुदुर्ग जिल्हा बँकवर नारायण राणेंच्या नावाचा शिक्कामोर्तब

      सिंधुदुर्ग बालेकिल्ला हा नारायण राणे यांचाच... 

      संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी चुरशीने मतदान झाले.  निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी शिवसैनिक संतोष परब  यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये गरमागर्मी बघायला मिळाली.  या हल्ल्याप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले असून जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. 

      नारायण राणेंचा बालेकिला असलेल्या सिंधुदुर्ग मध्ये नेहमीच त्यांच्या बाजूची लढत हि चुरशीची असते. आणि यावेळी सुद्धा असेच झाले.  राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते. आज झालेल्या मतमोजणी मध्ये सेनेला मोठा धक्का बसला असून, जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव झालं आहे. मतमोजणी सामान झाल्यानंतर शेवटचा निर्णय हा चिट्टीद्वारे झाला, आणि यामध्ये भाजपाचे उमेदवार विठ्ठल देसाई यांनी सतीश परब यांचा पराभव करून या निवडणुकीवर आपल्या नावाचा शिक्कामोर्तब केला. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत नारायण राणेंचं  वर्चस्व होत,  २००८  पासून बँक राणे यांच्या अधिपत्याखाली होती. मात्र, २०१७ मध्ये जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत यांनी राणे यांच्यापासून फारकत घेत शिवसेनेत गेले. त्यानंतर बँके शिवसेनेच्या ताब्यात दोन वर्ष राहिली. परंतु आता पुन्हा एकदा सिंधुदुर्ग बँक निवडणूक अर्थातच सिंधुदुर्गचा बालेकिल्ला राणेंच्या हातात आला आहे. महाविकास आघाडीला बसलेली हि भारी चपराक असून, राणेंचं वर्चस्व हे नेहमी कायम असणार आहे याच तगडं उदाहरण भाजपाने सगळ्यांसमोर दाखवले आहे. 

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट