चिंताजनक बातमी - देशामध्ये ४५१ नवीन ओमायक्रॉन रुग्णांची वाढ

            देशामध्ये वारंवार नवीन ओमायक्रोन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनामुळे बसलेला धक्यामधून सारेजण सावरत नाही तर ओमायक्रोन व्हेरियंट डोकं वर काढलं आहे. आणि आज देशामध्ये ओमायक्रोन रुग्णांचा आकडा ४५१ वर गेला असून आज नवीन १७ रुग्णांची नोंद झाली आहे. 

            गेल्या २४ तासांत एकूण कोरोनाचे ७१८९ नवे रुग्ण आढळले आहेत. याच दरम्यान ओमायक्रॉन व्हेरियंटची धास्ती वाढली आहे. आणि याच व्हेरियंटची सगळ्यात जास्त रुग्ण महाराष्ट्र मध्ये आढळले आहेत. देशात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून ४५१ वर आकडा गेला असून महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात या राज्यांमध्ये सर्वात जास्त धोका वाढला आहे. ओमायक्रॉन चा वाढत संसर्ग लक्षात घेता, सध्या महाराष्टामध्ये रात्री जमावबंदी सुरु करण्यात आली आहे. त्याचसोबत ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर या दोन दिवसाचे महत्व लक्षात घेत नवीन नियमावली सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. एका ठिकाणी कोरोनाचे सावट कमी होत असताना दुसरीकडे ओमायक्रॉन ची भीती सगळ्यांना भेडसावत आहे. तूर्तास तरी केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे टास्क फोर्सच्या बाबतीत खूप प्रमाणात सक्रिय आहे. 


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट