Breaking News
सध्या युट्युब चॅनेल हे सर्रास सुरु आहेत, यांवर येणार प्रत्येक कॉन्टेन्ट हा झपाट्याने व्हायरल होतो, मग तो मनोरंजन बाबतीत असो, क्रीडा बाबतीत असो किंवा अजून काही पण काही असे चॅनेल सुद्धा आहेत, जे अनेक संस्था विरोधात आवाज उठवत आहेत. अनेक गंभीर अश्या विषयांवर अफवा पसरण्याचा काम करत आहेत. याच अनुषंगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Ministry of Information And Broadcasting) बनावट बातम्या प्रसारित करण्यासाठी आणि भारतविरोधी प्रचार करणाऱ्या वीस यूट्यूब चॅनेल आणि दोन वेबसाइट्सवर बंदी घातली.
काश्मीर, बिपीन रावत, राम मंदिर, एकात्मता, भारतीय लष्कर यांसारख्या गंभीर विषयांवर फुटीरवादी वक्तव्य करण्यासाठी या चॅनलचा वापर करण्यात येत आहे. आणि हे असे चॅनेल आताच्या तरुण पिढीसाठी खूपच धोक्याचे असल्यामुळे भारत सरकारने अनेक अशा चॅनेलवर बंदी घेतली आहे. भारत सरकारने बंदी घातलेल्या वीस YouTube चॅनेलपैकी किमान १५ चॅनेल ‘नया पाकिस्तान ग्रुप’ या एकाच ग्रुपद्वारे चालवले जात होते. नया पाकिस्तान ग्रुप (NGP) ने YouTube वर खोट्या बातम्यांचा प्रचार करण्यासाठी पाकिस्तानी न्यूज अँकर आणि कलाकारांचा वापर केला. हे सारे चॅनेल आपल्या इथे जातीवादी फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे भारत सरकारने लवकरात लवकर या चॅनेल वर बंदी घालत एक महत्वाचे पाऊल उचलले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant