नेटफ्लिक्सने सब्सक्रिप्शनच्या दरात केली कमालीची घट

    सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन्स आहेत, आणि प्रत्येक स्मार्टफोनमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म्स चे अँप हे असतातच असतात. नवीन चित्रपट असो किंवा एखादी नवीन वेबसिरीज सारेजण ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपले मनोरंजन करताना दिसतात. परत या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन हे महाग असल्यामुळे प्रत्येकाच्या खिशाला परवडणारे नसतात. परत आज नेटफ्लिक्सने त्याच्या दरात कमालीची घट केली आहे.

     २०१६ पासून नेटफ्लिक्स भारतात सेवा देत असून पहिल्यांदाच आपल्या दरात कपात केली आहे. एंट्री-लेव्हल बेसिक प्लॅनमध्ये ग्राहकांना वेब सीरिज आणि चित्रपट स्टँडर्ड डेफिनिशन (SD) मध्ये एकाच वेळी एकाच मोबाइल, टॅबलेट, कॉम्प्युटर किंवा टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहता येतात. हा प्लान ४९९ प्रति महिना होता. तो आता १९९ रुपये करण्यात आला आहे. तर टू शेअरिंक स्क्रिन असलेला हाय डेफिनेशन प्लान ६४९ रुपयांवरून ४९९ रुपये करण्यात आला आहे.  त्याचसोबत अल्ट्रा हाय डेफिनेशन चार स्क्रिन शेअरिंग प्लान ७९९ रुपयांवरून ६४९ रुपये करण्यात आला आहे. नेटफ्लिक्सची मोबाइल प्लान भारतात जुलै २०१९ पासून १९९ रुपये प्रति महिना होता. आता हा प्लान १४९ रुपये प्रति महिना उपलब्ध असेल. मार्केटमध्ये बवाढ्त असलेली चुरस आणि कट थ्रोट कॉम्पीटेशन याचमुळे नेटफ्लिक्सने हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.  

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट