Breaking News
मुंबई प्रतिनिधी ता.1
प्रवाशांची सुरक्षा व गुन्हे प्रतिबंधच्या अनुषंगाने तसेच सतर्कतेच्या दृष्टीने दिपावली सणानिमित्त सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील मेन लाईन येथे सीएसएमटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, (ता.1) नोव्हेंबर रोजी विशेष घातपात विरोधी तपासणी मुख्यालय घाटकोपर येथील बीडीडीएस व श्वान पथकाच्या मदतीने करण्यात आली. सदर घातपात विरोधी तपासणी करिता सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक तानाजी भांडवलकर व 7 पोलीस अंमलदार तसेच मुख्यालय घाटकोपर येथील बीडीडीएस व श्वान पथक यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित अदटराव, श्वान - रुद्रा, हँडलर कुमार माने, तांत्रिक निलेश भांडवलकर उपस्थित होते.
यात रेल्वे स्टेशन परिसरातील अडगळीच्या जागा, फलाट, कचराकुंड्या, बुकींग हॉल, कॅन्टीन, स्टेशन परिसर, स्वच्छतागृह येथे काटेकोरपणे तपासणी करण्यात आली. यात काही एक आक्षेपार्ह आढळून आले नाही.अशी माहिती सहभागी सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी दिली.फोटोओळ - दिपावलीनिमित्त सतर्कतेचा दृष्टीने प्रवाशांच्या सुरक्षेतेसाठी सीएसएमटी स्थानकात रेल्वे पोलिसांची विशेष घातपात विरोधी तपासणी.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade