Breaking News
मुंबई प्रतिनिधी दि:23
विद्यापीठाच्या कुलसचिवपदी सुधीर पुराणिक यांची नियुक्ती करण्यात आली असून यापूर्वी ते मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे प्रभारी संचालक म्हणून कार्यरत होते. यावेळी पत्रकार जनार्दन येडगे, भारूडकार अनिल केंगार व सिल्व्हेस्टर पारखी यांनी डॉ पुराणिक यांची भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.पाली येथील शेठ जे. एन. पालीवाला महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक म्हणून पुराणिक कार्यरत होते. एकूण ३४ वर्षांचा त्यांचा शैक्षणिक अनुभव आहे. उपप्राचार्य म्हणूनही अनेक वर्षे ते कार्यरत होते. २००४ ते २०१४ पर्यंत राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तर २०११ ते २०१४ पर्यंत जिल्हा समन्वयक म्हणून त्यांनी काम केले.
मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे प्रभारी संचालक म्हणून त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांच्या कारकिर्दीत विद्यापीठामार्फत अनेक समाजपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले. मावळते प्रभारी कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला.कुलसचिव पदासाठी ८ मे २०२१ रोजी विद्यापीठाने जाहिरात प्रसिद्ध केली होती. आलेल्या अर्जदारांची २४ आणि २५ सप्टेंबर २०२१ रोजी मुलाखत पार पडली व निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार पुराणिक यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी पत्रकार जनार्दन येडगे,भारूडकार अनिल केंगार व सिल्व्हेस्टर पारखी यांनी कुलसचिव डॉ पुराणिक यांची भेट घेऊन पूढील वाटचालीस शुभेच्छा
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade