Breaking News
मुंबई प्रतिनिधी, दि. 21
केंद्रसरकार हमसे डरती है... ईडी को आगे करती है... नारायण राणेंच्या चौकशीचं काय झालं... कृपाशंकर सिंग यांच्या चौकशीचं काय झालं... विजयकुमार गावित यांच्या चौकशीचं काय झालं... बबनराव पाचपुते यांच्या चौकशीचं काय झालं... किरीट सोमय्या जवाब दो... जवाब दो... अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ईडी कार्यालय परिसर दणाणून सोडला.
किरीट सोमय्या दुपारी दोन वाजता ईडी कार्यालयात येणार असल्याची कुणकुण राष्ट्रवादी युवक काँग्रेसला लागताच युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ईडीच्या कार्यालयाबाहेर युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
किरीट सोमय्या यांनी नारायण राणे, कृपाशंकर सिंग, विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते यांच्याविरोधात ईडीकडे भ्रष्टाचाराचे पुरावे देत तक्रार दाखल केली होती. मात्र हेच नेते भाजपमध्ये गेल्यावर किरीट सोमय्या त्यावर काहीच बोलत नसल्याने आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करू लागल्याने संतापलेल्या युवकांनी 'किरीट सोमय्या जवाब दो' असे आंदोलन केले. अचानक झालेल्या आंदोलनाने किरीट सोमय्यासुध्दा चक्रावून गेल्याचे पाहायला मिळाले. भाजपमध्ये गेलेल्या लोकांची चौकशी का थांबली... त्यांच्या चौकशीचं काय झालं असे प्रश्न ईडी कार्यालयाबाहेर युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी उपस्थित केले. दरम्यान आंदोलन करणार्या युवकांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade