Breaking News
अभ्युदयनगरचा पुनर्विकासाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार-उपमुख्यमंत्री
मुंबई - बँकेच्या पुढाकाराने सुरू झालेली स्वयंपुनर्विका योजना मुंबईकरांसाठी खऱया अर्थाने वरदान ठरेल. अन्य बँकांनीही या योजनेचे अनुकरण केले पाहिजे, असे सांगतानाच अभ्यूदय नगरच्या पुनर्विकासात येत असलेल्या अडीअडचणी सरकार दूर करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुंबई बँकेच्या अभ्यूदय नगर येथील शाखेचे उदघाटन केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या उद्घाटन सोहळ्याला आमदार प्रसाद लाड, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, मुंबई बँकेचे ज्ये… संचालक शिवाजीराव नलावडे, संचालक नंदकुमार काटकर, नितीन बनकर, संदीप घनदाट, विष्णू घुमरे, आनंदराव गोळे, मुंबई बँकेचे कार्यकारी संचालक डी. एस. कदम, मुख्य सरव्यवस्थापक संदीप सुर्वे यांच्यासह सहकारातील पदाधिकारी, अभ्यूदय नगर मधील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
अभ्युदयनगरचा महत्वाकांक्षी पुनर्विकास निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने रखडत चालला आहे. या निविदांचा फेरविचार करण्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी मागच्याच आठवडयात बोलून दाखवली. तोच धागा पकडून उपमुख्यमंत्री शिंदे आपल्या भाषणात म्हणाले, अभ्यूदय नगरच्या पुनर्विकासात ज्या अडचणी येतील त्या सरकार दूर करेल व मुंबईतील जे रखडलेले प्रकल्प आहेत त्यांना चालना देण्याचा प्रयत्न सरकार, गृहनिर्माण विभाग करेल, असेही शिंदे यांनी आश्वस्त केले. स्वयं पुनर्विकास योजनेतून सर्वसामान्यांना घर मिळवून देण्यासाठी मुंबई बँकेने जे काम केले त्याला तोड नाही. मुंबईत अनेक एसआरए प्रकल्प रखडले. त्यांची बैठक आपण घेऊ. जो मुंबईकर बाहेर राहायला गेला, बेघर झाला अशा मुंबईकरांना मुंबईत परत आणायचे असेल तर एसआरए व रखडलेल्या प्रकल्पांना चालना देणे गरजेचे आहे.
लवकरच बैठक : सहकारमंत्री
राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, कोणतीही बँक कर्ज देताना वयोमर्यादा पाहते. पण मुंबई बँकेने ज्यांचे कोणी नाही त्यांनाही कर्जवाटप केले. हे वर्ष सरकारने सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे. प्रविण दरेकर यांनी दिलेल्या मागण्यांच्या निवेदनावर लवकरच बैठक लावू आणि सहकार विभागामार्फत जे-जे काही लागेल ते देणार असल्याचेही सहकारमंत्री म्हणाले. तत्पूर्वी भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर म्हणाले, मुंबई बँक ही राज्यातील आदर्श बँक आहे. आम्ही सामाजिक बांधिलकी समजून काम करतो. लाडकी बहिणींसाठी एकही रुपया न घेता जिल्हा बँकेत खाती उघडली. आता लडक्या बहिणीसाठी 10 हजारापासून ते 29 हज- रापर्यंत विनातारण व्यवसायासाठी कर्ज देणार आहोत. यावेळी आमदार प्रसाद लाड, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, मुंबई बँकेचे संचालक नंदकुमा काटकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यव्त केले. कार्यप्रमाचे सूत्रसंचालन मुंबई बँकेचे संचालक नितीन बनकर यांनी केले.
स्वयं पुनर्विकास योजनेत 1600 प्रस्ताव आमच्याकडे -दरेकर
स्वयं पुनर्विकास योजनेत 1600 प्रस्ताव आमच्याकडे आले. छोटया घरात राहणारा माणूस मोठय़ा घरात राहायला गेलाय. ही योजना आपण ठाण्यातही राबवू शकतो. ठाणे मनपाला सोबत घेऊन स्वयं पुनर्विकास योजना राबवावी अशी विनंतीही दरेकरांनी केली. स्वयं पुनर्वीकासाबाबत काही निर्णय झालेत तर काही निर्णय होणे बाकी आहेत. बाकी निर्णयांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्या, अशी विनंतीही दरेकरांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना केली. मुंबईत वॉर्डात जशी पालिकेची कार्यालये आहेत. तशी सहकाराची कार्यालये व्हावीत. महापालिका तसे आयुव्तांना आदेश द्यावेत. मुंबई बँक मध्यम वर्गीयांची आहे. ती सशव्त करण्याची गरज आहे. खासगी बँकांना ताकद देण्याची गरज नाही. जिल्हा बँकेला डिपॉझिट मोठया प्रमाणावर दिलीत तर बँक सशव्त होईल, असे दरेकर म्हणाले.
मुंबईतील एसआरए प्रकल्प पूर्ण केल्याशिवाय महायुती सरकार राहणार नाही-उपमुख्यमंत्री
चप्रीवादळापासून लाडक्या बहिणींची काळजी घेतली म्हणून मुंबई बँक आमची लाडकी बँक आहे, अशी नोंद करत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या राजवटीत मुंबई बँकेवर चौकशी लावली. प्रविण दरेकर यांना अटक करण्याचे षडयंत्र रचले गेले. मला जेव्हा कळले तेव्हा मी स्पीड वाढवला आणि टांगा पलटी केला. मुंबई बँकेमार्फत तुम्ही ज्या काही मागण्या केल्यात त्याबाबत सरकार पॉझीटिव्ह निर्णय घेईल. मुंबईतील एसआरए प्रकल्प पूर्ण करण्याचे बाळासाहेबांचे म्हणून स्वप्न होते. ते पूर्ण केल्याशिवाय महायुती सरकार राहणार नाही. निवडणुकी पुरता मराठी माणूस, मुंबईकर करून चालणार नाही, असा टोला शिंदे यांनी शिवसेनेच्या उबाठा गटाला लगावला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे