Breaking News
मराठी भाषेवरील वक्तव्यावरून विधिमंडळात गदारोळ
मुंबई - मुंबईतील एका कार्यक्रमात मराठी भाषा बोलणे काही ठिकाणी आवश्यकच नाही अशा प्रकारच्या वक्तव्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भय्याजी जोशी वादग्रस्त ठरले असतानाच आपल्या या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला असा खुलासा त्यांनी केला तर विधिमंडळात यावरून मोठा गदारोळ झाला.
घाटकोपर मधील एका कार्यक्रमात मराठी भाषा बोलणे आलेच पाहिजे असे नाही असे वक्तव्य भय्याजी जोशी यांनी करून मराठीचा अवमान केला असा मुद्दा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी उपस्थित केला, त्यावरून सभागृहात सत्तारूढ आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले , हमरीतुमरी देखील झाली, विधानसभेत पाच मिनिटे कामकाज तहकूब झाले तर विधानपरिषदेत विरोधकांनी सभात्याग केला. बाहेर देखील त्याचे मोठे पडसाद उमटले, मनसे कार्यकर्त्यांनी जोशी यांच्या फोटोला जोडे मार आंदोलन केले, राज ठाकरे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा चौकात आंदोलन करण्यात आले.
राज्याची , मुंबईची आणि सरकारची भाषा मराठीच आहे असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले तर दुसरीकडे भय्याजी जोशी यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, आपल्याला आहे म्हणायचे नव्हते असा खुलासा केला आहे. मात्र यातून सरकारवर हल्लाबोल करण्याची एक चांगली संधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका ज्येष्ठ नेत्याने विरोधकांना आयतीच दिली असे पाहायला मिळाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे